आणि कलम ३७० उडाले.

लेखांक १०९

स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षातील सर्वात परीवर्तनासाठी अवघड पण राष्ट्रीय विचाराने जे १५०/२०० वर्षांच्या सततच्या प्रयत्नातून सिध्द केले ते राजकीय परीवर्तन आपण पहात आहोत.

यातील  समाजाच्या राष्ट्र भावनेवर विश्वास असलेले राष्ट्रीय सरकार आल्यावर सर्वात महत्वाचे परीवर्तन व संभवतः या शतकावर पूर्ण प्रभाव टाकणारी सर्वात प्रभावी कृती म्हणजे जम्मू काश्मीर राज्याचे वेगळेपण जपणारी कलम ३७० रद्दबातल करणारी कृती होय.

राजकिय दृष्टीने अत्यंत कठीण निर्णय पण नेतृत्वाचा जनसामान्यांच्या आशा आकांक्षा वर पूर्ण विश्वास असेल तर कसा सहज घेता येऊ शकतो याचे सर्वोत्तम राजकीय उदाहरण आहे.

२०१९ ची निवडणूक झाली व अमित शहा गृहमंत्री झाले. त्यावेळी अंदाज येऊ लागला होता. की भारताची ३७० कलमाची भळभळती जखम भरून निघेल कि काय? त्यासाठी रणनिती बनतं होती. राजकिय साठमारी व. वाटत असतानाच मेहबुबा मुक्तींबरोबर चे सरकार अल्पमतात आले. त्यांनी राजिनामा दिला. एक एक चाली यशस्वी होत, एका सकाळी राज्यसभेत स्फोट झाला. ३५ एए हटल्यावर अनेकांना कळले की काय झाले.
सामान्य भारतीयांच्या एका राष्ट्रीय स्वप्नाची पूर्तता मोदी शहा या जोडीने राष्ट्रवादी शक्तींवर विश्वास ठेवून करून दाखविली.

व पुढील इतिहास आपणास माहिती आहे. राजकिय परीवर्तन यासाठी करायचे होते. गलवान, डोकवान, सर्जिकल स्ट्राईक व त्यापेक्षा महत्वाचे ३७० कलम जाण्यासाठी. कारण ३७० जाणे हे फक्त एखाद्याच्या इच्छाशक्तीच्या प्रयत्नांनी होणार नव्हते तर जनेच्छेचा आदर करणा-यांनी संपूर्ण व्यवस्था हालवायची होती व जनतेनेही तो विश्वास सार्थ करायचा होता.

सरकारने काम केले व जनतेने विश्वास सार्थ केला. काश्मीरात सामान्य माणसाला आवाज फुटला. ख-या अर्थाने काश्मिरच्या भारत विलीनीकरण प्रक्रिया सुरू झाली.

हे सर्व पैलू म्हणजे संपूर्ण राजकीय परीवर्तन. याचा एक राहिलेला पैलू जो लवकरच पूर्ण झाला की या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठे राष्ट्रीय यश सिध्द होईल. अखंड भारत.

स्वातंत्र्योत्तर शताब्दी साजरी करतानाची लेखणी चालवणारे जे कोणी असतील ते या परीवर्तनाला प्रत्यक्ष साक्षी असतील.

या अशावादासह राजकिय परीवर्तनाचा उहापोह थांबवू या.

सुनील देशपांड
Article(109/n)
Photo courtesy Google.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन