समाज परिवर्तनाची प्रक्रिया

लेखांक ११०

दीर्घकाळ राजकीय परीप्रेक्षातील परीवर्तनाचा आपण अभ्यास केला. व त्याचे परीणाम दृश्य स्वरूपात व पटकन जाणवणारे असल्यामुळे ते अभ्यासणे आवश्यकही होते.

पण त्याच्या बरोबरीने सामाजिक, सेवा, अशा अनेक क्षेत्रांत सुध्दा राष्ट्र सर्वप्रथम ठेवून कार्यरत राहिल्यामुळे समाज परीवर्तनाची आंदोलने ही समाजवीण विस्कटणारी झाली नाहीत. उलट समाज अधिक सक्षम होण्यासाठी मदतच झाली.

स्वातंत्र्यपूर्व काळातील सुधारक व स्वातंत्र्यप्रेमी आंदोलक यांचे नाते विळा भोपळ्याच्या सख्यासारखे वाटायचे. पण या समाज सुधारणांमध्ये राष्ट्र विषयी विचारशील चिंतन असलेला समाजाचा मोठा हिस्सा उतरला त्यावेळी ते समाज परीवर्तन तुलनेने खुप सोपे वाटू लागले.

या विषया संदर्भातील वैचारिक मांडणी आपण सुरवातीच्या लेखांमधून पाहिली आहे. त्यातील पूर्व अट होती, ज्या समाजात परीवर्तन करायचे त्या समाजाला स्वत्व स्वाभिमानाची जाणीव असली पाहिजे. ते परीवर्तन त्या समाजाने स्वतः हून पटवून घेतले पाहिजे. समाजाविषयी ममत्व व बंधुभाव असला पाहिजे.

या अटी पूर्ण करून केलेले समाज परिवर्तनाचे प्रयत्न नक्की यशस्वी ठरतात व ते चीरस्थायी स्वरूपाचे असतात.

या विषयातील काही स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांवर प्रभाव टाकून योग्य दिशेने झालेले प्रयोग पुढील काही लेखांमधून पाहू यात.

सुनील देशपांडे.
Article (111/n).

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन