सामाजिक चिंतनाची दिशा

लेखांक १११


कोणतेही सामाजिक प्रश्न वा समस्या या प्रामुख्याने त्या देशातील बहुसंख्यांक समाजाच्या समस्या अथवा प्रश्न असतात. त्यामुळे भारतीय समाजाचे प्रश्न हे स्वाभाविकच हिंदू समाजाचे प्रश्न व दोष या संदर्भात आहेत.


समस्या सोडवताना एक समाज सुधारक प्रयत्न करतात व दोन कायदा आपली भूमिका पार पाडतो. पण या दोनही ठिकाणी काही मर्यादा आहेत. 


त्या प्रामुख्याने समाज सुधारक हा गट घेतल्यास त्या सुधारकाला समाजाची मान्यता व सुधारकाला समाज ममत्व किती आहे यावर अवलंबून असते. तसेच समाज ताडण करायचं आहे कि समाज शिक्षण करावयाचे आहे, यावर त्या सुधारणा अवलंबून असतात. समाज कुरिती ह्या प्रत्येक समाजात कालौघात  येत असतात हे सूत्र त्या समाज सुधारकाने स्वीकारले आहे का? महान समाजाचे पतन झाले असले तरी मूळ तत्व महान आहेत व ती पुनर्प्रस्थापित  करायची आहेत हा भाव सुधारकाचा आहे का? हे प्रश्न नकारात्मक आले कि कलह उत्पन्न होतो पण हेतू साध्य होत नाही.


तसेच कायद्याचे असते. मानसिक परिवर्तन झाल्या शिवाय कायदा परीणामकारकता दाखवू शकत नाही. गोरे काळे हा वाद अमेरीकेला गृहयुध्दापर्यंत घेऊन गेला पण गोरी श्रेष्ठत्व मानसिकता डोके वर काढते व जाणवते कि ज्यांनी कायदा राबवायचा त्यांच्या मानसिकतेत हे अजून उतरत नाही.


अमेरीकेतील समस्या ४००/५०० वर्षेच जुनी आहे पण हिंदू समाजाचे अस्तित्व हे हजारो वर्षांपासून आहे. त्यामुळे ह्या समाज सुधारणेसाठी खूप वेगळ्याच पातळीवर प्रयत्न आवश्यक होते व ते कसे केले गेले हे पुढील लेखांमधून पाहू या .


सुनील देशपांडे
Article (112/n)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन