सामाजिक प्रश्न व राष्ट्रकारण
लेखांक ११२
इंग्रजी शिक्षणाच्या आधारे समाजाचे परीक्षण व गुण दोषांची चर्चा करण्याची सवय लागल्यामुळे समाजसुधारकांच्या कार्यशैलीमध्ये दोषाचे शोध व त्यावर आक्रमक हल्ला हे आलेच पण त्या बरोबरीने इंग्रज साक्षात प्रभू व त्यांच्या येण्याने ह्या समाजदोषांचे भान आम्हा आले हा भाव दृगोचर होत होता.
त्याचा स्वाभाविक परीणाम स्वातंत्र्योत्सुक जनता व पुढारी यांच्या विरोधात ही चळवळ प्रामुख्याने आहे हाच भाव जनतेच्या मनात ठाण मांडून बसला.
स्वातंत्र्य चळवळ हतोत्साही व्हावी म्हणून हे सर्व प्रयत्न आहेत हा भाव जागा राहिला. पण त्याहूनही दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे आम्ही महान संस्कृती आहोत व त्यातील दोष दूर करण्यासाठी हा समाज सुधारण्याचा व्याप आहे हा भाव कधी या आंदोलनांमध्ये जाणवला नाही व दुसरं कि आमच्या शत्रूला (इंग्रजांना) कायदा करण्याच्या विनवण्या केल्या गेल्या ज्यातील हा अपमान लढाऊ समाजाने स्वीकारला नाही.
तरीही समाज सुधारणा समाजानेही स्वीकारल्या का व कशा? याचा मार्ग कोणता होता व त्या मार्गाने या ७५/१०० वर्षातील प्रवास कसा झाला व काय साधले हे पुढील लेखांमधून पाहू यात.
सुनील देशपांडे.
Article (113/n)
Comments
Post a Comment