भारतीय राजकारणातील दुविधा
लेखांक १०२
हिंदू समाजाने राजकीय तडजोड न स्वीकारता केलेल्या राजकीय प्रवासामुळे आधुनिक भारतीय राजकारण एका वेगळ्याच दुविधेमध्ये ( Paradox) अडकले.
सामान्यपणे सर्वत्र राजकारण हे सत्ताधारी विरूध्द इतरे जन असे चालत असते. पण जनसंघापासून तत्वज्ञानाधिष्टित राजकारण आल्यामुळे राजकीयदृष्ट्या अल्पसंख्याक असलेला जनसंघ अथवा भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्ष असे न पहायला मिळालेले राजकीय चित्र भारतीय राजकिय पटलावर पहायला मिळू लागले.
सकृतदर्शनी विरोधी आघाडी, काॅंग्रेस विरूद्ध बनायची, पण त्यात इतका तकलादूपणा असायचा कि ही विरोधी पक्षांची आघाडी आहे कि सत्ता पक्षाची बी टीम आहे हेच कळायचे नाही. किंबहुना ही आघाडी फोडताना एकच टाहो फोडला जायचा कि जनसंघ जातीय आहे.
आघाडी भौतिक विषयांवर असायची व फुटताना भौतिक नसलेल्या विषयावर फुटायची. व त्याचे कोणतेही स्पष्टीकरण दिले जायचे नाही.या अर्थाने ही दुविधा भारतीय राजकारणात स्पष्ट दिसायची कि छोटा विरोधीपक्ष जनसंघ विरूद्ध सत्ताधारी काँग्रेस व अन्य सर्व विरोधी पक्ष.
जनता पक्ष हा आणिबाणी विरूद्ध म्हणजे हुकुमशाही विरुद्ध तयार झाला. एका अर्थाने लोकशाही संरक्षणासाठी तयार झाला व फुटला द्विपक्षीय सदस्यत्वावरून.
बोफोर्स भ्रष्टाचाराविरुद्ध स्थापलेल आघाडी सरकार अयोध्या प्रश्नावरून पडल. व शेवटी बाबरी ढाचा
पडल्यावर भाजप विरूद्ध सर्व असे वातावरण बनले. हेच दृश्य ३७० कलमाविरूध्दही दिसले.
याचे विश्लेषण पुढील लेखामध्ये.
सुनील देशपांडे
Article (103/n)
Comments
Post a Comment