समाज व समाज सुधारणा
लेखांक ११३
या सनातन समाजामध्ये समाज परीवर्तन करण्यासाठी प्रक्रिया काय असावी यातील समाज सुधारकांचे प्रयत्न व कायदा यांच्या मर्यादा आपण पाहिल्या. याचा अर्थ त्या प्रयत्नांचे महत्व अजिबात कमी होत नाही. पण ज्या पूर्व अटींशिवाय हे शिव धनुष्य उचलले जात नाही त्यांचा वापर कसा झाला व त्याचे परीणाम कसे घडले हे आपण प्रामुख्याने पाहू यात. समाजावर प्रेम, त्या विषयी स्वाभिमान हे असणारे नेतृत्व कसा विचार व कृती करत होते हे आपण पाहू यात.
योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता व सारखे महापुरुष हे धर्म, अध्यात्म या आधारे काम करत असताना समाज निर्दोष बनविण्यासाठी प्रयत्न करत होते. विवेकानंद हे तर जातीयता हा शाप आहे, शास्त्रार्थ नंतर आधी मैदानावर खेळा असे सल्ले देत होते. व समाज ते सल्ले ऐकत होता. कारण ते विवेकानंद शिकागोत या समाजाच्या महानतेचा डंका पिटून मग समाजाला कोण होतास तू काय झालास तू असा प्रश्न विचारत होते.
तसेच थोडे मागे गेले कि ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांनी या समाज दोषाचे दुष्परिणाम भोगले पण त्यामुळे संतापून जाऊन या सुधारणा केल्या नाहीत तर शिक्षा भोगल्या व सांगितले की आपण चुकत आहोत. व जातपात विरहीत वारी निघाली. तुम्ही चूक आहात व मी बरोबर सांगतो हा भाव नव्हता म्हणून परीवर्तन झाले. धर्म नाकारून नाही तर धर्माला धरून नाही म्हणून दोष सोडा हा भाव ठेवला, तेंव्हा ते परीवर्तन समाजाने स्वीकारले.
याचे आधुनिक काळातील, कालोचित प्रयत्न आपण आता पहाणार आहोत. धर्म, समाज यातील काहीही न नाकारता त्याच्या महानते समोर नतमस्तक राहून ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, साधू संतांचा मार्ग, आधुनिक काळातील विवेकानंद, अरविंद, रामकृष्ण परमहंस, गुलाब महाराज यांचा मार्ग चोखाळत हे समाज परीवर्तनाचे प्रयत्न सुरू झाले व यशस्वी झाले. कसे झाले हे प्रयत्न, ते पुढील लेखांमधून.
सुनील देशपांडे
Article (114/n)
Comments
Post a Comment