भारतीय राजकारणातील दुविधा भाग २

लेखांक १०३

अशा प्रकारे एक विरोधीपक्ष विरूद्ध सरकारी पक्ष अधिक सर्व विरोधी पक्ष असे विचित्र राजकारण या स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षात दीर्घकाळ पहायला मिळाले.

जनसामान्यांच्या ध्येयाला दाबून टाकून आमच्या वैचारिक भूमिका हा या देशाचा व देशातील सर्वांचा  ध्येयवाद हे लाडकं पालुपद चालू होते. कारण ते मोडून काढू शकणारा पक्ष एकछत्री अमलात येत नव्हता.त्यामुळे ते थोपवलेले विचार निर्णायक मोडून काढण्यासाठी २०१४ सालापासून प्रयत्न सुरू झाले. यात मग माझ ध्येय मीच सांगणार, हा हिंदू समाजाला वाकड लावण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला, त्यांना हिंदू समाजाने एका वाक्यात सांगितले, कि जर माझ्या ध्येयवादा आड याल, अथवा त्याची टिंगलटवाळी कराल, अथवा त्याच्या अस्थांच्या विषयाशी खेळाल तर इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा अशी अवस्था करून सोडू.

मग आवार्ड वापसी षडयंत्र आले तर ती अवार्ड वापसी गॅंग आहे हे हिंदू समाजाने सांगून टाकले.  जेनयुने पहिल्यांदी राष्ट्रद्रोहाच्या आरोपाचा चटका अनुभवला. व सामान्य माणसाचा अभिव्यक्त होण्याचा नवीनच अनुभव JNU च्या Ivory tower मध्ये राहणा-या विचारवंतांनी  घेतला. शिक्षणाची वय किती,? शिक्षणासाठी खर्च, कोणत्या विषयांवर विद्या वाचस्पती पदव्या. व कुंडल्याच मांडून जेएनयू ही शिवीच बनवून टाकली.

अल्पसंख्याक अन्याय, mob lynching व. विषय काढून बहुसंख्यांक वाद हे  अंतिम अस्त्र बाहेर काढले. पण हिंदू समाजाने हे अस्त्रच  कवचासारखे वापरून ३७० ही उडवले व तीन तलाखला हात घालून शरीया अडून वेगळेपण सांभाळायला जाल तर गाढवही जाईल व ब्रम्हचर्य ही असे सर्वांना बजावून सांगितले.

अशा प्रकारे ध्येयवाद संघर्षच फक्त सत्य असतो हे भारतीय राजकारणात हिंदू  समाजाने सिध्द करून दिले हि या स्वातंत्र्योत्तर ७५ काळातील  सर्वात मोठी राजकीय उपलब्धता आहे.

सुनील देशपांडे
Article (104/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन