सरकारातील भारतीयत्व लख्ख झळकले.

लेखांक १०४


२०१४ साली भारतात प्रथमच डाव्या वायुमंडलाच्या अत्यंत विपरीत विचाराचे संपूर्ण बहुमतातील सरकार केंद्रात आले. त्यामुळे नवीन सरकारच्या प्रत्येक कृतिकडे सामान्य जन कुतूहुलाने किंवा म्हणता येईल लहान मूल जसे जादुच्या प्रयोगाकडे कुतूहलाने बघते तसे बघू लागले, तर वैचारिक विरोधक अचंबित होऊन.


यात मेडिसन स्क्वेअर मधील आत्मविश्वास जागवणारी अभूतपूर्व भारत विजय सभा असो वा नऊ दिवस उपवास करत व फक्त पाण्यावर रहाणारा तरीही कार्यमग्न पंतप्रधान असो.
राजकीय पटलावर भारतीयत्व जगाने आधुनिक काळात प्रथम पाहिले ते या मेडिसन स्क्वेअर सभेमध्ये. भारतीय संस्कृतीचे राजकीय स्वरूप जगाला प्रथमच दिसले.
जागतिक योगा दिवसावर शिक्कामोर्तब असो वा युनोत पाकिस्तानला ठोकणे असो. भारतीय जनतेला आनंदाच्या गुदगुल्या होत होत्या तर जगाला खरा भारतीय म्हणजे हिंदू स्वभाव, व्यवहार राजकीय स्तरावर कसा आहे हे समजू लागले होते.


असा भारत आहे हे जगाने पाहिले नव्हते. एक माणूस नाही तर सामान्य भारतीय हा सहज व्यवहार म्हणून लंघन करतो ह्या सारख्या छोट्या गोष्टींसाठी सुध्दा 'भारत की नयी खोज' करावी असे जगाला वाटू लागले. असे भारतीयत्वाचे आविष्कार जगभरू लोकांनी पाहिले होते पण आता सरकारही फक्त भारतीय नाही तर भारतीय संस्कृतीचे अभिमानदर्शक आहे तर ते कसे वागते हे जगाने पाहिले.


व त्याचे परिणाम तसेच अन्य वेगळेपण पुढील लेखांमधून.
सुनील देशपांडे
Article (105/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन