समाज परिवर्तनाचे स्थायी स्वरूप
लेखांक ११४
समाजाचा स्वत्व व स्वाभिमान जागवून, समाजामध्ये आत्मविश्र्वास जागा करून मग दोषाची चर्चा झाली तर स्थायी स्वरूपाचे परीवर्तन घडते.
याच्यामधील संत परंपरेतील प्रयत्न आपण पाहिले कि त्यांनी विठ्ठल नाकारला नाही, समाजाच्या अन्यायाने समाजाचा तिरस्कार केला नाही तर त्यामुळे तेथे जातीची जळमट गळून पडली.
सामाजिक सुधारणांसाठी त्या समाजातील आस्थांविषयी आपल्यालाही तेवढेच ममत्व हवे हे वारकरी संप्रदाय व ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांनी शिकवले.
पण अता आपण जे सामाजिक परिवर्तन पहाणार आहोत यामध्ये आध्यात्मिक वलयांकित महापुरुष नाहीत तर समाजातील सामान्य माणसांनीच हे कार्य हाती घेऊन गत ७५ वर्षात स्थायी परीवर्तन घडवून आणलं आहे. व त्यामुळे हे काम अमूल्य ठरते. व त्याचा स्वतंत्र विचार करणे गरजेचे ठरते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत १९२५ साली स्वयंसेवकांपाशी ही एकरस एकात्म हिंदू समाज ही संस्कार प्रक्रिया सुरू झाली. एक स्वयंसेवक, त्याचे कुटुंब अशी दैनंदिन व्यवहारातून परीवर्तनाची साखळी सुरू झाली.
उक्ती व कृती एक याचा अनुभव समाजाला येऊ लागला व संस्कार शब्दाने नाही तर वैयक्तिक कृतीने होतात याचा अनुभव स्वयंसेवक व समाज दोघेही घेऊ लागले.
समाज परीवर्तनासाठी या प्रकारे सिध्द झाल्यावर, बंधुभावाची अनुभूती मिळाल्यावरच पुढील वाटचाल सुरू झाली.
महापुरूषाने जन्म घेऊन नवनिर्माण करावे या संक्लपनेला छेद मिळाला व आता समाजात जे काही करायचे ते कोणाच्या येण्याची वाट न पहाता, आम्ही समाज म्हणून करणार हा भाव जागा झाला. व समाज परीवर्तन हे सुधारकांचे नव्हे तर समाजाचे स्वतःचे काम आहे हे निश्चित झाले.
त्याची वाटचाल पुढील लेखांमधून.
सुनील देशपांडे
Article (115/n)
Comments
Post a Comment