श्री गुरूजी व धर्माचार्यांचे सीमोल्लंघन

लेखांक ११८


धर्माचार्यांचा समाज परीवर्तनासाठी सहभाग ही संकल्पना इतकी नाविन्यपूर्ण व परीणामकारक होती कि त्याचे दृश्य परिणाम फारच झटपट मिळू लागले.


तरीही या मागील खरी शक्ती होती, संघटित हिंदू समाज व सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक व्यक्ती म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी. त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अध्यात्मिक प्रेरणांद्वारे त्यांनी या सर्वांचे एकत्रिकरण करून दाखवले व या महानुभावांमधील कार्यकर्ता भाव जागवला.
श्रीगुरूजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पण हिंदु हितासाठी स्वतः चे सर्वात प्रमुख कार्य व जे त्यांनी स्वतःच करावयाचे होते ते म्हणजे धर्माचार्यांचे मिलन. व ते त्यांनीच पूर्ण केल्याने धर्माचार्य व समाज सुधारणा हे अवघड गणित सुटले.


समाजात कलह, दोष, विकृती दिसेल तेथे सत्य धर्म तत्व सांगण्यासाठी  हे धुरीण हिरीरीने भाग घेऊ लागले.


याचे पहिले प्रत्यंतर आले मिनाक्षीपुरम या तामिळनाडू राज्यातील गावात. पुर्वी वारंवार घडणारा प्रसंग असे कि दलितांचे अन्यायामुळे धर्मांतरण.


पण यावेळी गुणात्मक फरक पडला. हजारो हिंदूंचे धर्मांतर झाले पण लज्जित हिंदू दबून न बसता चूक दुरुस्त करू लागला. 


संत महंत गल्ली गल्लीत फिरले. विश्वास दिला. वस्तीला राहिले. सहभोजन करू लागले. ज्या साधु संत मठाधीश लोकांकडून विश्वास हवा होता तो मिळाला. घर वापसी सुरु झाली. दलित वंचित म्हणून गेलेला समाज हिंदू म्हणून स्वाभिमानाने परतला.


या मठांचे विसरलेले सेवेचे कार्य पुन्हा सुरू झाले. फक्त मिनाक्षीपुरम नाही तर देशभर हिंदू सारा एक चा घोष सुरू झाला. प्रसंग सुदूर दक्षिणेतील पण सकारात्मक प्रतिक्रिया पूर्ण देशभरात उमटले.


कोणत्याही प्रकारे चुकीच्या परंपरांचे समर्थन होणार नाही हे धर्म धुरीण सांगू लागले व धर्म जागरण सुरू झाले. 


धर्म सर्वांसाठी व धर्मासमोर सर्व समान हा भाव या जागरणातून जागा झाला.


त्यातील आणखी काही कृती व उक्ती पुढील लेखांमधून.


सुनील देशपांडे.
Article (119/n)
Photo courtesy Google 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन