संघटित समाज ही परिवर्तनाची पूर्वअट

लेखांक ११९


जसे आपण पाहिले कि समाज सुधारणा हा विषय हिंदू समाजाने सुधारकांचे प्रयत्न व कायदा यापेक्षाही धर्माचार्यांच्या मधील परीवर्तना नंतर अधिक लवकर व मूलभूत स्वरूपात स्वीकारला. तसेच प्रामुख्याने या सर्व सुधारणा स्वीकारल्या गेल्या त्या मागे प्रमुख कारण होते की हिंदू समाज संघटित झाला होता. 


संघटित समाजात, सर्व घटक सम्मिलीत असतात व या एकत्र आलेल्या सर्वांचे प्रश्न हेच समाजाचे प्रश्न असतात. समाज संघटित केला गेला म्हणजे काय झाले तर अठरा पगड जातीत वाटला गेलेला, आपापसातील जीवंत संपर्क तुटलेला, हा समाज निस्वार्थ बुध्दीने एकत्र आला व येतच राहीला व म्हणून सर्व समाजाला आपापसात आत्मिय भाव निर्माण झाला. त्यामुळे दुराव्यामुळे निर्माण झालेले परकेपण गळून पडले, ओळख निर्माण झाली व स्वाभाविक दुस-याची पीडा ही समजू लागली. ह्या आत्मिय एकत्रिकरणाला संघटित समाज म्हणतात.


एकमेकांची ओळख लागल्यावर एकत्र भोजन सुरू झाले. एकमेकांच्या घरी येण जाण सुरू झाल. त्यातून रोटी बेटी कडे प्रवास सुरू झाला. शिक्षणाची आस लागली. 


हिंदू ही ओळख मिळाली. जातीची लाज पळाली. व हा संघटित समाज म्हणून आलेली ओळख, आत्मियता या आधारे समाज परीवर्तन सुरू झाले. 


म्हणून या ७५ वर्षांत  ही नवीन अनुभूती घेतली कि समाज परीवर्तनाची मुख्य अट समाज संघटन ही आहे. आधी समाज संघटित केला गेला. त्या संघटित होण्याचा आधार कायम प्रेम, आत्मियता, ओळख हाच राहिला व परिणामी आपलेपणाने दोष विरून गेले.


सामाजिक सुधारणा व परीवर्तन हे असे घडले. आधी संघटन, आत्मियता, स्वत्व, स्वाभिमान निर्माण व म्हणून स्वयंप्रेरणेने स्वतः मधील दोष, तृटी कमी करण्यासाठी प्रयत्न अशा क्रमाने स्थायी परिवर्तन घडत राहिले.


असेच अनेक क्षेत्रांत घडले जे पुढील लेखांमधून पाहू यात.


सुनील देशपांडे
Article (120/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन