वनवासी क्षेत्र व राष्ट्र जागरण
लेखांक १२०
आत्मिय भावनेने समाज एकत्र आल्यावरच, म्हणजे संघटित झाल्यावरच द्वेषमूलक भावनेशिवाय समाज परीवर्तन, दोष निर्मुलन समाजात घडू शकले.
असाच अनुभव आणखी एका दाहक क्षेत्रात या ७५ वर्षात समाजाने घेतला.
एवढ्या खंडप्राय देशावर राज्य करायचे असेल तर समाज विस्कळीत, आत्मभान विरहीत असणे आवश्यक होते व त्यासाठी अनेक युक्त्या, तत्वे इंग्रजांनी वापरली व त्याला आपण दीर्घकाळ बळीही पडलो. त्यातील एक नाजूक कडी प्रयत्नपूर्वक दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे वनवासी बंधूंना मुख्य प्रवाहापासून त्रयस्थ ठरविणे.
चंद्रपूर महाराष्ट्र चे आदीवासी स्वातंत्र्य सैनिक बाबुराव व असे असंख्य नरविर स्वातंत्र्यासाठी लढले व वीरगतीला प्राप्त झाले. म्हणून आर्य आक्रमणं सिध्दांत फसला.
यासाठी अर्थात अपरिहार्य गोष्ट म्हणजे वनवासी हिंदू नाहीत हे बिंबवणे. निसर्गपूजक आहेत, मूर्ती पूजक नाहीत. हे बिंबवणे. यासाठी तुम्ही मूळ पुरुष असून त्या आर्यांनी तुम्हाला पराभूत करून असं जंगलात देशोधडीला लावले आहे, हे पटवून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी आर्य आक्रमण हा धादांत खोटा सिध्दांत तयार करणे व तात्विक पातळीवर, इतिहासातून हे असत्य पुनः पुन्हा मांडणे हे इंग्रजांनी केले.
इंग्रजांनी शिक्षीत केलेला व नवोदयी डाव्या विचाराने भारावलेला बुध्दीवादी वर्ग असत्य पाया बरोबर गृहित धरून त्या असत्याचा जोरदार प्रचार करत राहिला.
इतर सर्व प्रश्नांप्रमाणे या प्रश्नावरही हिंदू समाज कात्रीत सापडला व फक्तं सत्य हातात धरून संधीची वाट पहात उभा राहिला होता.
व स्वातंत्र्योत्तर भारतात त्याला व्यक्त होता आले व प्रश्नही सोडवता आला.
कसे ते पुढील लेखांमध्ये पाहू यात.
सुनील देशपांडे
Article (121/n)
Comments
Post a Comment