वनवासी व रामाचा वनवास

लेखांक १२१


आदीवासी बांधव हिंदू नाहीत. या वैचारिक नाट्याची तयारी सुमारे १५० वर्षे चालू होती. त्या जोडीला चर्चचे जमिनी स्तरावर आक्रमण झाले. सेवेच्या नावाखाली धर्मांतरण सुरू झाले व त्याच वेळी सर्व समाजाचे  स्वातंत्र्याचे एकांडे प्रयत्न चालू असल्याने या सांस्कृतिक संकटाकडे समाज म्हणून संपूर्ण हिंदू समाज लक्ष देऊ शकला नाही. त्यामुळे एकात्म हिंदू समाज ही सत्य संक्लपना व्यवहारात आदीवासी क्षेत्रात दिसत नव्हती.


परंतू स्वातंत्र्योत्तर सर्वंकष राष्ट्र पुनर्निर्माण  कार्यात आदीवासी प्रश्नाची सोडवणूक सुध्दा हिंदुत्वाच्या व्यापक संक्लपने अंतर्गतच प्रमुखपणे झाली.


आदीवासी समाजाशी उर्वरित समाजाचा तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्याचा आधार दोहोंतील एकात्मता हाच राहिला. व विश्वास निर्माण करणे, नात्यावर साचलेली दुराव्याची धुळ दूर करण्याचे मूलभूत काम सुरू झाले.


जुने गांधीवादी ठक्कर बाप्पा व. लोकांचे प्रयत्न सुरू होते पण त्याला साथ मिळाली, संघटित होत चाललेल्या एकत्रित हिंदू समाजाची. व बघता बघता जटील वाटणारा प्रश्न सुटू लागला.

निस्वार्थ बुध्दीने आदीवासी सेवा करणा-या एकांड्या प्रयत्नातील ठक्कर बाप्पा यांचे योगदान विशेष आहे. पुढील संघटित हिंदू समाजाच्या प्रयत्नात याचे मोल फार होते.

यातील पूर्वांचलातील परिवर्तन आपण आधीच्या लेखांमध्ये पाहिले आहे. आदीवासी क्षेत्रातील सर्वात संवेदनशील प्रश्न कसा सुटला हे आपण हिंदू ओळख व सेवा या माध्यमातून सुटलेला पाहिला.


पण आदीवासी हे जवळपास सर्व भारतभर विखुरलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक प्रभू रामचंद्र हेच या प्रश्नांवरील कार्यात मदतीला धावून आले. रामाचा चौदा वर्षांचा वनप्रवास हा संपूर्ण हिंदू समाजाला एकात्म करणारा प्रवास हाच या कामाचा आधार ठरला.


ही सर्व समाजाची एकात्मतेची ओळख घेऊन सुरू झालेला प्रवास पुढील लेखांमधून पाहू यात.


सुनील देशपांडे
Article (122/n)
Photo courtesy Google 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन