लग्नाच्या वाढदिवसाची कथा.

पद्मा, सुनीलच्या लग्नाचा २६ व्या वाढदिवसाची कथा.

आजपर्यंत ह्या दिवसाला कधी फारशी कथा नव्हती. दोघांसाठी विशेष दिवस एवढेच. 
कधी ट्रीप, कधी बाहेर जेवण, कधी सिनेमा व.व. सर्व लग्नाचे वाढदिवस साधारण असेच. 
यावेळी मात्र ती आमच्यासाठी कथा बनली.
म्हणूनच सगळ्यांना सांगतो.
उद्या बाहेर कुठेतरी जेवायला जाऊ अशी नेहमीसारखी योजना ठरली. पण यावेळी कथा बनत होती ना?
ऋषिने, आमच्या मुलाने, प्रवेश करून हा प्रसंग कथा बनवून टाकला. काल संध्याकाळी त्याने फतवा जाहीर केला की आपण उद्या बाहेर जेवायला जाणार नाही.
उलट उद्या तुम्ही स्वयंपाक घरात यायचेच नाही. मी स्वयंपाक करून तुम्हाला पार्टी देणार. व ही थ्रिलर कथा सुरू झाली. 
आम्ही अनभिज्ञ आहोत व स्वयंपाक घर क्रियाशील हा या २६ वर्षातील पहिलाच प्रसंग होता.
व स्वयंपाक घर फक्त १९ तारीखच नाही तर अचानक १८ ला रात्री ९ वाजताच गजबजू लागले. व आम्हाला सक्तीने खोलीबंद व्हावे लागले.
उद्या एका दिवसात होणार नाही म्हणून चि. ऋषि वय २५, लौकिक शिक्षण बी टेक, एम बी ए, एका मोठ्या कंपनीत नोकरीला जायच्या तयारीत असलेला मुलगा, एकटाच स्वयंपाक घरात शिरला होता. ही पार्श्वभूमी एवढ्यासाठी कि हा प्रसंग माझ्यासाठी कथा का बनला.
पद्मा, सुनीलच्या लग्नाचा २६ व्या वाढदिवसाची कथा

सर्व खरेदीपासूनची तयारी यु ट्यूब,  मैत्रिणी व. च्या सहाय्याने करून हा आधुनिक श्रावणबाळ रात्री ९.३० ला स्वयंपाक घरात शिरला व रात्री ११.३० ला आम्हाला हाक आली. या बाहेर.
आम्ही आश्चर्यचकित. हिंदी सिनेमा भाषेत म्हणजे गाजर का हलवा तय्यार हुआ था. Everything was done by himself. त्याला येणारी डिश नाही तर आम्हाला आवडणारा पदार्थ बनवला होता. म्हणून माझ्यासाठी ही कथा बनली, नाट्य बनले व कौतुकाचा विषय ठरला.गाजर किसण्यापासून ते चवीने अचूक बने पर्यंत सर्व तयार झाले होते. पण विशेष गोष्ट होती एका स्वयंपाक घरात फारसा वावर नसलेल्या एका शिक्षीत मुलाने हौसेने केलेल्या पदार्थानंतरसुध्दा स्वयंपाक घर लख्ख होते. व जरा आश्चर्यकारक म्हणजे छोटा वजन काटा बाहेर होता. कारण सर्व वस्तू ग्राममध्ये मोजून घेतल्या होत्या. लालबुंद, खरपूस गाजर का हलवा चिरंजीवांनी एकहाती तयार केला होता.
आज सकाळी ९ वा. परत स्वयंपाक घर ताब्यात घेऊन पुढील नाट्य सुरू झाले. तत्पूर्वी ७.३० ते ९ जर्मन शिकवण्याचा ११/२ तासाचा online वर्ग घेऊन ही स्वयंपाक घर entry झाली होती.
आमच्या अनुपस्थितीत परत स्वयंपाक घर क्रियाशील बनले.कुकरच्या शिट्या ऐकू येत होत्या. अप्रतिम वासाने कळत होते की पहिल्या प्रयत्नातील एकहाती पावभाजीची भाजी बनत होती. भाज्या धुण्या चिरण्यापासून, खमंग वासा पर्यंतचा प्रवास पूर्ण झाला होता.
पाव तयार झाले.
पण कथेत आश्चर्य हवे होते. ते म्हणजे ही भाजी बनता बनता दुध उकळून फर्मास रबडी सुध्दा तयार झाली होती.
दोन पक्वान्न कशाला असा प्रश्न पडे पर्यंत आंबे बाहेर आले व आम्हाला पूर्ण नवीन अशी अंबा कुल्फी या डेझर्ट ची तयारी सुरू झाली. अंब्याचे झाकणा सारखे वरचे साल काढून, कौशल्याने कोय काढून,त्या अंब्यात रबडी भरून व नंतर वर झाकण बसवून कुल्फीची रवानगी डीफ्रिज मध्ये झाली.
व आमचे लग्नाच्या २६व्या वाढदिवसाचे जेवण सुरू झाले.
आम्हाला कौतुक वाटलेच, पण त्यापेक्षा स्वप्न पहाणा-या तरूण डोळ्यात आई वडिलांचा स्पेशल डे होता व त्यासाठी वेळ उपलब्ध होता, आवडींची आठवण होती म्हणून उर भरून आले. त्या स्वप्नांच्या भरारीत हा आई बाबांचा स्पेशल डे लोढण वाटला नाही तर सहकारी वाटला याच आश्चर्याची वाटले.
थोड आजुबाजुला पहाताना अभिमानही सुखावला.
असा हा आमच्या लग्नाचा २६वा वाढदिवस विशेष बनला, नाही चिरंजीव ऋषिने तो बनवला. 
आमच्यासाठी कथा बनला, नाट्य बनला, अविस्मरणीय बनला, खाजगी असला तरी ओरडून सांगावा असा वाटला,व मुख्य म्हणजे आमचा कुटुंब रचनेवरचा विश्वास वाढवणारा ठरला.

पद्मा व सुनील देशपांडे
९४२०४९५१३२/ ९४२२३१०२३१

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन