एकात्म भाव जागा झाला, दृष्टचक्र भेदले
लेखांक १२३
स्वतंत्र भारतात आदिवासी समाजात अन्य सर्व समाज मिसळून सेवा व संपर्क करू लागल्यावर आपल्या मूळ दैवतांमधील, राष्ट्र पुरूषांमधील अद्वैत सर्वांनाच समजून येऊ लागले.
रावण दहन ही आदीवासी भागातील एक चालत आलेली परंपरा सर्वच हिंदू समाजाला समजली. आज रावण पूजेचे सोंग घेऊन जे आदीवासी व उर्वरित समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आदीवासी म्हणून ओळखले जाणारे हिंदू बांधवच प्रत्युत्तर देत आहेत. फुटीरतावादी चळवळ तेंव्हाच अपयशी ठरते ज्यावेळी समाज वीण घट्ट असते. आज या कार्यामुळे ती घट्ट आहे म्हणून जय रावण ही विघटनवादी वृत्ती अपयशी ठरत आहे.
पण ही सांस्कृतिक ओळख अशी एका दिवसात उभी राहिली नाही. प्रयत्नपूर्वक त्या सांस्कृतिक भावनेवर माती लोटण्याचे किमान १००/१५० वर्षांचे प्रयत्न मोडून काढायचे होते. व ते काम स्वतंत्र भारतात हिंदू समाजाने हाती घेतले. आदीवासी महापुरुष, स्वातंत्र्य योध्दे यांच्या आठवणी जाग्या केल्या जाऊ लागल्या. इंग्रजांविरूध्दचे उठाव स्मरणात आणले गेले. महाराणा प्रतापांपासून, तंट्या भिल्ला पर्यंत सर्वांचे त्याग व बलिदान ह्याचे स्मरण झाले व परत एकदा आदीवासी समाजाचे राष्ट्रीय व सांस्कृतिक योगदान अधोरेखित झाले.
या संस्काराने प्रेरित तरूण आदीवासी नेतृत्व उभे राहिले. मागण्या सुरू झाल्या पण कोणातरी विरूद्ध विद्रोहातून नाही तर समन्वयातून.
गावात एसटी, नदी ओढ्यांवर साकवा पासून पेसा कायद्या पर्यंत सर्व काही मिळाले. विघटनवादी सुर न लावताच मिळवले.
व हे घडले कारण राष्ट्रवादी चळवळीने आधी सांस्कृतिक एकात्मता पुनर्जागृत केली व ह्या एकात्मतेच्या आधारावर आदीवासी बांधव संपूर्ण देशांबरोबर उभा राहिला.
एकात्मतेच्या प्रयत्नांची खूप उदाहरणे सांगता येतील पण महत्व आहे स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षातील परीवर्तनाची कारणमिमांसा. जी जागृक संघटित समाजाने करून दाखविली. म्हणून आदीवासी समाजातील परीवर्तन अभ्यासणे आवश्यक होते.
सुनील देशपांडे
Article (124/n)
Comments
Post a Comment