जागृत समाज हाच राष्ट्रीयत्वाचा आधार

लेखांक १२५


स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळात आजपर्यंत, विचारधारांची वेगवेगळी रूपे घेऊन या राष्ट्राच्या स्वाभाविक एकात्मतेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याचे व त्यासाठी काया वाचा मने प्रयत्न चालू राहिले.


यात इतिहासाचे विकृतीकरण, कलेचे बंदीस्तीकरण, धर्म संक्लपनेचे विकृतीकरण, समाजाचे वैचारिक उदासिनीकरण व. सर्व गोष्टी येतात. 


अर्थात प्रश्न पडेल की या सर्वांचा स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षे या विषयाशी काय संबंध आहे? तर थोडे स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते गत ७५ वर्षे या सर्व आक्रमणांचा अंदाज घेऊन ज्या पध्दतीने जागृत समाजाने हे आव्हान मोडून काढले, त्याचा अभ्यास होणे हे या ७५ वर्षाच्या इतिहासाचा धांडोळा घेताना अत्यावश्यक ठरते.


समाज विस्मृतीतून जागृत होत जाताना किती सहजपणे सर्व प्रकारची आक्रमणे शांततामय मार्गाने मोडून काढतो त्याचं जगातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे हे आहे. म्हणून या परीमाणाने स्वातंत्र्योत्तर भारताचा अभ्यास करावा लागत आहे.


जगाच्या पाठीवर भारत हे एकच असे सनातन राष्ट्र जीवन आहे कि ज्याची राष्ट्रीयताच परकिय व देशबाह्यनिष्ठा असणा-यानी प्रश्नांकित करून ठेवली होती. व त्या विरुद्ध समाजाने संघटित प्रयत्न करून सफळ विजय या ७५ वर्षात मिळवून हे एक सातत्यपूर्ण, सदा विकसित राष्ट्र जीवन आहे हे जगाला सिध्द करून दिले. विश्वातील एकमेवाव्दितीय असे हे विजय असल्याने या ७५ वर्षांच्या धांडोळ्यात हे अभ्यासणे हे अनिवार्य व रोमांचकारी आहे.


ते प्रयत्न व यश पुढील काही लेखांमधून.


सुनील देशपांडे.
Article (126/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन