सर्वे हिंदवा सहोदरा

लेखांक ११५

हिंदू समाज संघटित होऊ लागल्यावर अनेक समस्या ह्या स्वाभाविक सुटू लागल्या. हिंदू म्हणून हिंदू एकत्र येऊ लागल्यावर एक गाव एक पाणवठा यासाठी पार्श्वभूमी तयार होऊ लागली. व अशाच प्रकारे विश्व हिंदू परिषद स्थापन झाली. संपूर्ण देशाच्या इतिहासातील पहिला प्रसंग कि सर्व हिंदू पंथ, मत, विचार यांचे धुरीण एका व्यासपीठावर आले. आपल्या वैयक्तिक आग्रहाची सोवळी टाकून फक्त हिंदू म्हणून एकत्र आले. व काही भूमिका स्वीकारल्या. हे हिंदू धर्म इतिहासात प्रथमच घडत होते. ख-या अर्थाने हिंदू संसद भरू लागली.

आज पर्यंत हिंदू दोष निवारण ही फक्तसमाज घटकांशी निगडीत गोष्ट आता धर्म मुखंडाच्या विचाराधीन सुध्दा झाली.

धर्माच्या नावाखाली आलेल्या कुरीती या चूक आहेत हे जो पर्यंत धर्म मार्तंड स्वीकारणार नाहीत तो पर्यंत त्या नेत्यांना मानणारा हिंदू घटक त्या चुका स्वीकारत नाही ही भूमिका या सर्व ठिकाणी होती. म्हणून हिंदू धर्म धुरीणींना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. व त्या चळवळीला नाव मिळाले, विश्व हिंदू परिषद. जगभरातील हिंदू समाजाला सुध्दा एक व्यासपीठ मिळावे.
विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली व हिंदू धर्मातील सर्व धार्मिक प्रमुख,पंथ प्रमुख एकत्र आले व हिंदू समाज सुधारणा करू लागले. आश्चर्याने स्तिमित करणारी घटना.

या व्यासपीठावरून उडूपी येथील पहिल्या अधिवेशनात ठराव संमत झाला, न हिंदू पतितो भवेत. व सर्वे हिंदवा सहोदरा.

याचे अनन्यसाधारण महत्त्व हे  होते कि ठराव सर्व जातीपंथांच्या, धार्मिक नेत्यांनी केला होता. या ठरावाचे अनमोल महत्व व या ऐतिहासिक एकत्रिकरणाचा प्रभाव या स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षे व पुढील काळ यांवर कसा पडला आहे हे पुढील लेखांमध्ये पाहू यात.

सुनील देशपांडे
Article (116/n)
Photo courtesy Google 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन