वनवासी क्षेत्रातील सेवा साधना
लेखांक १२२
चर्च आक्रमणाबरोबर नक्षलवादी व विघटनकारी चळवळी यांच्या भक्षस्थानी आदीवासी समाज एका अर्थाने फेकला गेला होता.
परंतू एकांगी सेवा माध्यमातुन संपर्क ठेवलेल्या सेवाव्रतींना संघटित होऊ लागलेल्या हिंदू समाजाची साथ मिळाली व सर्वदूर सेवा संपर्काचे जाळे विणले जाऊ लागले.
आधुनिक शिक्षणाची नाळ तुटलेल्या या आदीवासी समाजासाठी एकल विद्यालय, वसतीगृहे ही पाड्या वस्त्यांवर सुरू झाली. कार्यकर्त्यांचा राबता सुरू झाला व शहरी माणूस म्हणजे शोषकच हा भाव निवळू लागला.
अडचणी जाणवू लागल्या. आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हत्या. सेवाभावी डाॅक्टरर्स जाऊ लागले. जीवन जगण्याचे मूल्य जाणवू लागले. व परिणामतः विश्वास व आत्मियता या आधारे एकात्म समाज उभारणी होऊ लागली.
समाज तोडण्यासाठी उत्सुकते ऐवजी समाज जोडणी करण्याचे प्रयत्न आदीवासी समाजाला जाणवू लागले. व परीस्थिती झपाट्याने पालटली.
पण खरी परीणामकारकता जाणवली ती सांस्कृतिक एकात्मतेमधून. ती कशी जाणवली ते पुढील लेखांमधून.
सुनील देशपांडे.
Article (123/n)
Comments
Post a Comment