फुटीरतेची बीजे व एकात्मतेचे प्रयत्न

लेखांक १२४


अशा प्रकारे देशातील परीवर्तनाचा अभ्यास करताना आपल्याला जाणवत राहिले कि कायमस्वरूपी पण सातत्यपूर्ण परीवर्तन हे समाजाने स्वयंस्वीकृत असावे लागते.


समाजात कोणतेच परीवर्तन वा दोष निर्दालन हे थोपून होत नाही तर ते समाजाने आत्मसन्मानाने मिळवावे लागते. ते समाजाने स्वतः खस्ता खाऊन मिळवावे लागते. जसे आदीवासींमध्ये फुटीरतावादी चळवळ मोडून काढण्यासाठी संपूर्ण समाजाने एकात्मिक भावनेने व सांस्कृतिक एकात्मते आधारे काम केले व आज हे परीवर्तन पहात आहोत.


अशाच प्रकारे विघटनवादी प्रयत्न स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या मदतीने व नंतर स्वातंत्र्योत्तर काळात डाव्या विचारवंताच्या मदतीने होत राहीले.


 जसे इतिहास, शिक्षण पध्दती, सर्व प्रकारच्या कला, धर्म संक्लपना, या सर्व क्षेत्रात फुटीरतावादी, विकृत संक्लपना रूजवून एकात्मतेची वीण उसवून टाकण्याचे प्रयत्न झाले. या ७५ वर्षात जागृत, स्वत्वशील समाजाने हे आक्रमण कसे मोडून काढले व काढत आहे ते पुढील लेखांमधून पाहू यात.


सुनील देशपांडे.
Article (125/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन