वैचारिक द्वंद्वाची दोन शतके
लेखांक १२७
जगभरातील इस्लाम आक्रमणानंतर शस्त्रा बरोबरच, ज्ञान विज्ञानाचा उपयोग गुलाम देशाला कायमस्वरूपी गुलाम मानसिकतेत ठेवण्यासाठी केला जाऊ लागला.
आक्रमक युरोप व अमेरीका यांची जगभरातील पदचिन्हे ही याबाबत उदाहरणे म्हणून लक्षांत येतील. नायजेरियन नागरिक तर स्वतःला Black British म्हणवतात असे सर्वत्र बोलले जाते. बराचश्या आफ्रिकन देशांची अवस्था याहूनही भिन्न नाही. तशा अर्थाने मध्यपूर्व आशिया सुध्दा या नियमाला अपवाद नाही.
भारतात तर ब्रिटीश १५० वर्षे ठाण मांडून होते. व भारतासारखा खंडप्राय व पराक्रमी देश तर निव्वळ शस्त्राने ताब्यात ठेवणे शक्य ही नव्हते. त्यामुळे भारतात तर छद्म विज्ञान, इतिहास, कला ज्ञान, सामाजिक शास्त्रे या सर्व शस्त्रांचा क्रूर वापर या समाजावर केला गेला.
पण आकार उकाराने खंडप्राय, व ज्ञान विज्ञान समृद्ध हिंदू समाज व भारत या सनातन राष्ट्राचा असा घास घेऊन पचवणे अवघड होते.
जागृत समाजाने व समाजहितैषींनी हे पुरेसे आधी ओळखून, युध्दाची तयारी सुरू केली होती. व शंभर/ दिडशे वर्षे लढून यशस्वीही करून दाखविली.
ती कशी हे पुढील लेखांमध्ये पाहू यात.
सुनील देशपांडे
Article 128/n)
Comments
Post a Comment