सा विद्या या विमुक्तये
लेखांक १३१
कलाक्षेत्र हे कलाकाराच्या स्वाभाविक अभिव्यक्तीचे संव़ेदनशील स्पंदन असते, नव्हे असले पाहिजे असे मानले जाते व त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही या क्षेत्राच्या विकासाची मूलभूत गरज मानली जाते. ती श्रोते, दर्शक, प्रेक्षक यांच्या इच्छेनुसार होत नाही तर कलाकाराचे ते उत्स्फूर्त प्रकटीकरण असते. त्यामुळे कलाविष्काराला कोणत्याही स्वरूपाच्या बंधनात वा चौकटीत बांधलं जाऊ नये ही अपेक्षा असते.
भारतात हजारो वर्षांपासून या परंपरेचे पालन झाले. असेही म्हणता येईल की त्याचा उगमही अनेक प्रकारे भारतात पाहता येईल.
यातील मूळ आधारभूत सिध्दांत म्हणजे
सा विद्या या विमुक्तये.
तेच खरे ज्ञान जे मानवाला बंधमुक्त करते. याहूनही कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सुस्पष्ट व्याख्या कोणती असू शकते.
जगभरही अशाच प्रकारे कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याकडे पाहिले गेले. पण कला स्वातंत्र्य या विषयावर तीन प्रमुख विचारांनी प्रचंड दडपण आणले, मर्यादा आणल्या, विकृती निर्माण केल्या.
या अडचणी समाजाच्या मर्यादीत आकलनाने आल्या असत्या तर स्वातंत्र्य इच्छुक मनाने त्यावर मात केली असती, किंबहुना केलीही होती पण ख्रिश्चॅनिटी, ईस्लाम व कम्युनिझम यांनी कला स्वातंत्र्य विरोध हा विचार सामाजिक झुंडशाहीने दडपण्यास सुरवात केली व अभिव्यक्त स्वातंत्र्य ही सूळावरची पोळी बनली. मला सापडलेले सत्य हे मृत्यूदंडाच्या शिक्षेचे कारण बनू लागले.
हे कसे घडले व त्याचा भारतीय स्वातंत्र्योत्तर समाजावर काय परीणाम झाले व भारताने या शतकभरापासून काय प्रयत्न केले व यश संपादले ते पुढील काही लेखांमधून पाहू यात.
सुनील देशपांडे.
Article (133/n)
Comments
Post a Comment