कलाक्षेत्रातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोंडी
लेखांत १३२
एकारलेल्या विचारधारा प्रभावी बनल्यामुळे सत्याचा शोध तर थांबलाच पण सत्याची बाजू घेणे सुध्दा जोखमीचे होऊ लागले. पंथ प्रमुखच तलवारीने सत्य सांगू लागल्यावर तर कला ही अभिव्यक्तीचे साधन न राहता , भितीचे सावट बनून राहिली. चर्च हा सेवाभाव न राहता सैन्य बनले व नंतर तितकीच एकारलेली साम्यवादी चळवळ आली व कलाक्षेत्र सुमारे एक हजार वर्षं व्यक्त होण्याऐवजी संघर्षरत राहिलं. पहिल्या दोन्ही प्रकारातील अभिव्यक्ती विरोध हा पंथ विकृती संदर्भातील अभिव्यक्तीसाठी प्रामुख्याने होता पण साम्यवादाने वैचारिकदृष्ट्या, अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्यच नाकारले.
भारतात या तिघांच्या जोडीला स्वातंत्र्योत्तर राजकीय विचारशून्य नेतृत्व सत्तेत आल्यामुळे या तिघांचे फारच फावले. एक अघोषित वैचारिक आणीबाणी ही स्वातंत्र्यपूर्व काही वर्षे व नंतर स्वातंत्र्योत्तर काळात चालू राहिली. देशप्रेमी साहित्य जर हिंदू संस्कृतीचे उदात्तीकरण करेल तर तो साहित्यिक, चित्रकार, संशोधक, कलाकार हा वाळीत पडलाच म्हणून समजा. देशप्रेम हे सैनिकांचे पाकिस्तान युध्द एवढेच स्तिमित राहीले. ज्या राष्ट्राची जगाला ओळख धर्म म्हणूनच आहे त्या देशातील कलेतून धर्म, संस्कृती हे हद्दपार झाले वा विकृतीकरण करूनच मांडायला परवानगी मिळते असे घडू लागले.
विकृती किती टोकाला गेली होती कि फाळणीवर एखादी कथा, कादंबरी, चित्र इस्लामला दोष देणारे निघू शकले नाही पण ' तमस' सारखी हिंदू समाजाला गुन्हेगार ठरवणारी कादंबरी मात्र दिमाखात दूरदर्शन वर मालिका रूपात चमकून गेली.
अशा वैचारिक विकृतीत कलाविष्कार आडकला होता. ती भयंकर परीस्थिती थोडी समजून घेऊ व समाजाने ती उलथून अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसे सुप्रतिष्ठित केले ते पुढील लेखांमधून पाहू यात.
सुनील देशपांडे.
Article (132/n)
Comments
Post a Comment