वैचारिक झुंडशाही व निवडक अभिव्यक्ती स्वातंत्र्य

लेखांक १३३

'तमस'च्या उदाहरणावरून  आपण पाहिले कि अभिव्यक्ती ही कशी वैचारिक झुंडशाही मध्ये अडकली होती. पु. भा. भावे यांची साहित्य सेवा त्यांचा साहित्यिक म्हणून  सन्मान करण्यास अपूरी पडली, असेही आपण पाहिले.

पण सुक्ष्मपणे कलाक्षेत्रातील ही वैचारिक हुकूमशाही कलेच्या अभिजात प्रकटीकरण करण्यास मज्जाव करू लागली. समाज रागावून उथळ प्रतिक्रिया देत असे त्यावेळी हि सर्व कलाक्षेत्रातील झुंड अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाने गळा काढायची पण कंपूशाहीतून गाळून जी अभिव्यक्ती नाकारली जायची तेंव्हा मात्र सर्वत्र आमेन असायचे.

जगातील सर्वात जास्त अनैतिक धार्मिक जागा म्हणजे चर्च. लहान मुलांचे शोषण, साध्व्यांचे शोषण, पैशाचा गैरव्यवहार, राजकारणात लुडबुड, सर्वत्र विकृत व्यवहाराने गाजणारे चर्च, कलाक्षेत्रात मात्र शुध्द, पवित्र, कनवाळू, पतितपावन. ते साहित्य असू दे, सिनेमा, दृकश्राव्य, चित्र माध्यम असू दे, चित्र हेच. व हेच क्षेत्र, सहिष्णुतेचा परमावधी हिंदू धर्म वा त्यातील एखादा विकृत ढोंगी सापडला तर मात्र धारदार शस्त्रानिशी हल्ला करणार.

इस्लाम मध्ये तर प्रेषितच तलवार घेऊन रक्त सांडतो व घण घेऊन मूर्ती फोडतो, पण भारतीय कलाक्षेत्रात तो शांतीदूतांचा पंथ बनतो. यातील विकृती  दाखवण्याचा प्रयत्न जर झाला तर डेक्कन हेराल्ड जळून खाक होत व या वर्तमानपत्राच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी वैचारिक क्षेत्रातील झुंडी कडून कधीही व्हायचीच नाही.

पण  कलाक्षेत्रातील या विकृतीची काजळी ऊडू लागली व समाजमन निर्भेळ कलाविष्कारासाठी वायुमंडल तयार करू लागले. 

कसे ते पुढील लेखांमधून पाहू यात.

सुनील देशपांडे.
Article (134/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन