कुंठीत विचारधारा व अभिव्यक्ती स्वातंत्र्य

लेखांक १३४


या तीनही विचारधारा विचारात घेण्याचे कारण म्हणजे कलेमध्ये अनस्युत असलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे या तीनही विचारधारांनी, विचारधारा म्हणून नाकारले. अन्यत्र ते समाजाच्या कुंठीत मानसिकतेतून नाकारले जात होते. तो तिढा सोडवणे सोपे असते. पण तत्वज्ञानातच विकृती असेल तर ती दूर करणे फार जड जाते.


बर फक्त अनुयायांना स्वातंत्र्य नसेल तर ही समजू शकते पण अनुयायी नसलेल्या समाजावर अभिव्यक्ती बंदी. इस्लाम वा ख्रिश्चॅनिटी फक्त स्वतः पुरते तरी बंधने घालत होती पण साम्यवादाने त्यावरही कडी केली. इतिहास द्वंव्दात्मक भौतिकवादाच्या चौकटीमध्येच बसवायचा असा अट्टाहास धरला व जगातील सर्वच इतिहास अशास्त्रीय पध्दतीने व सर्वार्थाने अनैतिक व अनैसर्गिक मांडला जाऊ लागला.


एकीकडे अभिव्यक्ती विरूद्ध तलवार तर दुसरीकडे बौध्दिक झुंडशाही याच्यामध्ये सर्व जगातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अडकून बसले व कलावकाश आक्रसू लागलं.


यातील संघर्ष व यश पहाण्यासाठी एक पुस्तक फार महत्वाचे असे पायातील दगड ठरले. रामस्वरूप यांनी लिहिलेले Understanding Islam through Hadis.
राम स्वरूप यांनी इस्लाम व ख्रिश्चेनिटीला चिकित्सेच्या चौकटीत आणून ठेवले व अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हिंदू भाव हा समाजाचा स्वभाव असला पाहिजे हे जाणवून दिले.


हदीस म्हणजे प्रेषितांची स्वतः ची कृति वा उक्ति वा समर्थन वा मूक संमती व. प्रषितांच्या कृती अंत्यत अभ्यासूपणे या पुस्तकामध्ये मांडून आधुनिक जगात हे वर्तन विकृती ठरते हे सप्रमाण सिद्ध केले आहे. सर्व वैचारिक जग हादरून गेले. मुस्लिम बंधू तर अगतिक झाले पण बेडर रामस्वरूप ठाम राहिले व अभिव्यक्ती स्वातंत्र्या विरूद्ध विचारधारा म्हणून संघटित गुंडगिरी करणा-या एका विचारधारेला भारताने पोसलेल्या हजारो वर्षांच्या वैचारिक  स्वातंत्र्याच्या दुधावर पोसलेल्या पालकाने दोन्ही हाताने थोपवले.


हे एक उदाहरण घेतले पण हा लढा १०० वर्षे कसा लढला गेला ते पुढील लेखांपासून पाहू यात.


सुनील देशपांडे
Article (135/n)
Photo courtesy Google 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन