अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दुहेरी मापदंड

लेखांक १३५


या तीनही विचारधारा व त्यांच्या अधिपत्याखाली चालणारी राजकीय व्यवस्था यामुळे सा विद्या या विमुक्तये, या उक्तीचा पूर्ण हेतूच मातीत मिळून गेला.


चित्रकला क्षेत्रात प्रेषितांचे चित्र काढण्यासच बंदी तर व्यंगचित्र काढलेत तर साक्षात मृत्यू. फ्रान्सनी हा मृत्यू पाहिला व ओळखले कि मृत्यू व्यक्तीचा नाही तर मूल्यांचा आहे, चित्रकलेच्या अभिव्यक्तीला गोठवणारा आहे. पण भारतात या अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघर्षाला भारतीय वैचारिक झुंडीने समर्थन दिले नाही कि त्या मृत्युचा शोक केला नाही.
चार्ली हिबडो या फ्रेंच नियतकालीकात प्रेषित मुहम्मद यांचे व्यंगचित्र काढले म्हणून त्या व्यंगचित्रकाराचा खून करण्यात आला त्यावेळचे नियतकालिक परिसर.


चित्रपटात हलाला, तीन तलाक, हदीसची संपलेली कालोचितता हे कोणी दाखवूच शकत नाही. पण याहूनही खरी शोकांतिका भिन्न आहे. आमच्या वैचारिक झुंडीची संवेदना कुंठीत  असती तरी मान्य करता आले असते, पण ती फक्त कुंठीत झाली नाही तर selective झाली आहे. जो समाज स्वातंत्र्य व अभिव्यक्ती साठी हजारो वर्षांपासून जगाचे नेतृत्व करतो आहे त्या हिंदू समाजाला बदनाम करताना मात्र यांच्या कलांना धुमारे फुटतात व या फुटलेल्या धुमा-यांच्या रक्षणासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कल्लोळ माजवला जातो. पण त्याचवेळी या झुंडीच्या बाहेरील कुणाही साठी ही झुंड अवाक्षरही काढत नाही. ही कलाक्षेत्रातील निवडक भूमिका आहे व त्यामुळे ही विकृती वाढतच जात असते.


कायम स्वातंत्र्याचा मुक्त स्वीकार केलेल्या समाजाला, ही वैचारिक विकृती, प्रतिक्रियावादी बनवत आहे व बदनाम ही करत आहे.


म्हणून व्यक्तिगत स्वातंत्र्य जपत पण या दुतोंडी वैचारिक मुखंडाविरूध्द प्रतिक्रिया देणारी लढाई भारतीय समाजाने किती कौशल्याने लढली, ते पुढील काही लेखांमधून पाहू यात.


सुनील देशपांडे.
Article (136/n)
Photo courtesy Google 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन