अभिव्यक्ती स्वातंत्र्य व राजसत्तेचा पांगुळगाडा

लेखांक १३६

भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मूळ समस्या आपण जाणून घेतली. व ही फक्त भारताची होती असे नाही तर जगभरच होती. कारणं सोप आहे. या तीनही विचारधारांची जगभरातील कार्यपध्दती एकच आहे.

कितीही अशास्त्रीय व अनैतिहासिक असेल तरी आम्हीच सत्य व या व्यतिरिक्त अन्य कोणतिही अभिव्यक्ती फक्त असत्यच नाही तर ती व्यक्त करण्यासही बंदी.

अशा या वातावरणात भारतात स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षात या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढ्याला चांगलीच धार चढली. सर्व प्रकारच्या कला क्षेत्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची ठेकेदारी निर्माण झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही राज्य पध्दतीमुळे या कला क्षेत्रातील ठेकेदारांचा राजकीय आवकाश आक्रसून शून्यवत झाला होता. व त्यामूळे राजसत्तेच्या मदतीने आपले बस्तान बसविणे या ठेकेदारांना आवश्यक झाले व त्याचवेळी कोणतिही वैचारिक भूमिका नसलेल्या दीर्घकाळ सत्तेत असणा-या काॅंग्रेसला, वैचारिक पांगुळगाड्याची आवश्यकता निर्माण झाली होती.

व अशी भारतात कला क्षेत्रात अभद्र युती निर्माण झाली. पण या वेळचा संघर्ष हा राज्याच्या दावणीला बांधलेल्या जनतेशी नव्हता तर स्वयंप्रतिभेने राज्य, राष्ट्र संकल्पना, कला, समाज धारणा,या विषयी कल्पना स्वतः विकसित केलेल्या हिंदू समाजाशी होता. 

व तो या स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षात कसा लढला गेला ते पुढील काही लेखांमधून पाहू यात.

सुनील देशपांडे
Article (137/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन