कलेतून संस्कृती दर्शन
लेखांक १३७
राजकीय नेतृत्व व वैचारिक क्षेत्रातील नेतृत्व यांच्यातील अभद्र युती मुळे स्वातंत्र्योत्तर भारतात सत्यशोधन व आविष्कार स्वातंत्र्य याची आवश्यकता असते हेच मुळी अमान्य झाले. व त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही गरज आहे हे पटवून देण्यातच दीर्घकाळ गेला.
परंतू भारतीय जनजीवन हेच मुळी हजारो वर्षांपासून वादे वादे जायते तत्वबोध अथवा सा विद्या या विमुक्तये, अथवा ज्या विचाराचे वर्णन Relentless persuit of truth असे केले जाते या तत्वज्ञानावर पोसलेले आहे, त्यांना काही वर्षांपासून तत्वज्ञान म्हणून आलेला एकारलेपणा विरूद्ध लढा देणे अजिबात अवघड गेले नाही व या ७५ वर्षात लढून लढून ती एकारलेपणाची तत्वज्ञाने उघडी वाघडी करून टाकली आहेत.
भालजी पेंढारकर चित्र तपस्वी ही ओळख. तसेच त्यांनी अनेक हि-यांना पैलु पाडले. व राष्ट्रहीत समाज हीत हे कलेचे प्रमुख उद्दिष्ट ठेवले. राखेतून परत झेप घेतली.
मागच्या वेळी आपण रामस्वरूप यांचे Understanding Islam through Hadis याचे उदाहरण पाहिले आहे. असे सिने क्षेत्रात भालजी पेंढारकर हे नाव आपणास स्मरावे लागेल. कलाक्षेत्रात फक्त हिंदू समाजाचे दोष दर्शन करणारे सामाजिक विषय हेच फक्त प्रतिष्ठित असताना, ऐतिहासिक, देशभक्तीचा पुरस्कार करणारे चित्रपट काढणारे कोल्हापूरच्या कलानगरीला राष्ट्रीय स्तरावर नेणार-या भालजी पेंढारकर यांना या चुकीची शिक्षा भोगावी लागली. कोणते तरी कारण काढून स्टुडिओ जाळला गेला, कोल्हापूरचे कला महात्म्य संपवण्याचा घाट घातला गेला. पण भालजींनी राखेतून पुन्हा प्रपंच उभा केला व कलेला राष्ट्रीय विचाराचे वावडे निर्माण करू देणार नाही हा निश्चय सिध्द केला.
आजही निर्माण होणारे राष्ट्रीय भूमिका समजावून सांगणारे, शंकराचार्य कला माध्यमातून समजावून सांगणारे संस्कृत चित्रपट, सावरकर सिनेमातून पोहचवण्याचे प्रयत्न करणारे एकांडे शिलेदार, ह्या सर्वांना या भालजींच्या राख झालेल्या स्टुडिओ ने प्रेरणा दिली. कला क्षेत्रात परीवर्तन घडवून दाखविले.
असेच अजूनही कला क्षेत्रात मुशाफिरी करू यात.
सुनील देशपांडे.
Article (138/n)
Photo courtesy Google
Comments
Post a Comment