वैचारिक झुंडशाही विरूद्ध सर्वंकष संघर्ष
लेखांक १३८
कलेच्या प्रत्येक क्षेत्रात अशा प्रकारे वैचारिक झुंडशाही निर्माण करण्याचे स्वाभाविक प्रयत्न या विचारधारांनी जरी केले तरीसुद्धा प्रत्येक राष्ट्राचा जो एक वर्षानुवर्षांच्या संस्कारांचा परिणाम असतो तो भारतातील कलाक्षेत्राच्या मदतीला धावून आला.
बदल स्विकारणे हे स्वतंत्र वृत्तीच्या समाजाचे व्यवच्छेदक लक्षण असते व ते भारतीय समाजातही ओतप्रोत भरलेले आहे. व त्यामुळे एकारलेल्या विचार धारा या स्वाभाविक गतानुगतिक ,बदल न स्विकारू शकणा-या असल्यामुळे, या सहज परिवर्तनशील समाजा समोर शरण आल्या.
भारतीय समाज जीवन पटलावर काही महत्त्वाचे बदल घडत होते. ते समजून घेण्याचा वकूब या तीन ही विचारधारां जवळ नव्हता व त्यामुळे या तिघा विचारधाराना अचानक वावटळ आले आहे असे वाटत होते. पण हे वाटणे चूक होते.
कोणते मोठे बदल घडत होते?
१ राजकारणातीत हिंदू समाज संघटित होत होता.
२ समाज माध्यमे मध्यवर्ति भूमिकेत येऊ लागली होती
३ राजकीय सर्वंकष परिवर्तन व त्याची शक्ती.
या तीनही परिवर्तनाची कला क्षेत्राचा अवकाश मोकळा व झुंडशाही मुक्त करण्यासाठी कशी मदत झाली, ते या स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षाचा कालखंड अभ्यासताना अत्यावश्यक आहे व मनोरमसुध्दा.
कसे ते पुढील लेखांमधून पाहू यात.
सुनील देशपांडे
Article (139/n)
Comments
Post a Comment