अभिव्यक्ती स्वातंत्र्य व कलेतून राष्ट्र जागरण

लेखांक १३९


सामान्यपणे वैचारिक व कला क्षेत्र स्वतः चे अस्तित्व ज्या वेळी सत्तेच्या आधारे निर्माण करत असते त्यावेळी त्या वर्गाची कठोर आत्मपरीक्षणाची क्षमता संपलेली असते व त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ते क्षेत्र 'आहे रे' बनलेले असते. स्वतः चे स्वातंत्र्य गुंडाळून ठेवून ते विचारवंत व कलाकार सत्ताधीशांच्यासाठी सत्वशून्य लढाया लढत राहतात व हताशा अनुभवतात.


भारतातील हिंदू समाज संघटित होत होता. म्हणजे तो फक्त सत्तेसाठी प्रयत्नशील आहे हा समज करून घेऊन या विचारवंत झुंडीने फक्त राजकीय हितरक्षणाची संरक्षण व्यवस्था निर्माण केली. पण हे संघटन संपूर्ण समाजाचे स्वत्व जागवण्यासाठी आले आहे हे एकारलेपणामुळे ह्या वैचारिक झुंडीला समजावून घेतले नाही.


देशभक्तीपर गीते ही एक कला आहे व ती लाखो तरूणांना ध्येयाचे स्मरण देत आहे व विश्ववंद्य भारतमाता हे या कलेचे ध्येय आहे हे समजून घेतले नाही. त्यामुळे कलासक्त ध्येयवाद कलाकारांना दादरा नगर हवेली स्वतंत्र करण्याची प्रेरणा देईल हे या झुंडीला कधी समजलेच नाही.


कलेची प्रेरणा सावरकरही असू शकतात, हेडगेवार यांचे स्वप्न ही कलेची प्रेरणा असेल हे जाणून घेता आले नाही. पण घडत तर होते.


या समाजावर लादलेल्या वैचारिक ओझ्यांना फेकून देण्यासाठी हा स्वातंत्र्य प्रेमी समाज संघटित होत आहे हे कळले नाही.


म्हणून सत्तेभोवती वैचारिक स्वातंत्र्य गहाण ठेवलेल्या वैचारिक कंपूला व्यापक हिंदूत्वाच्या संकल्पनेला लढ्यासाठी जाती संघर्ष एवढेच शस्त्र वापरता आले. पण हे हिंदू संघटन सर्वंकष नवनिर्मिती साठी आहे हे न कळल्याने कालोचित युध्दनिती आखली गेली नाही व तो पर्यंत सर्वच कला क्षेत्राला संपूर्ण समाजाचा आसरा मिळाला होता. अभिव्यक्त होताना कलाकाराला अता हिंदुत्व ही वैचारिक झुंडीची शिवी, शिवी न वाटता ओवी वाटू लागली होती.


उत्तुंग ध्येयवादाने संघटित होणारा समाज म्हणजे काय हे नकळल्याने कलाक्षेत्र कधी समाजाने मुक्त केले हे समजलेच नाही.


असेच इतरही दोन मुद्यांबाबत घडले. ते आपण पुढील लेखांमधून समजून घेऊ यात.


सुनील देशपांडे
Article (140/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन