राष्ट्रीयत्वाची सैद्धांतिक लढाई
लेखांक १२८
इतिहास, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र व. सर्वांच्या मदतीने आर्य बाहेरुन आले, म्हणून हिंदू ही येथील उपरेच. हा ऐतिहासिक सिध्दांत मांडला व त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढा ही फक्त सत्तासंघर्षाची लढाई ठरवली गेली. त्यात तत्वज्ञान म्हणून जोरात असलेल्या डाव्या तत्वज्ञानाने राष्ट्र ही संकल्पनाच नाकारली व दृष्ट हेतूने निर्माण झालेल्या आर्य सिंध्दांतला राष्ट्र विरहीत राज्य संकल्पनेने अजूनच विषारी बनवले. आधीच मर्कट तयातही मद्य प्याला अशीच अवस्था झाली.
अशावेळी योगी अरविंदापासून, लोकमान्य टिळकां पासून सर्वांनी येऊ घातलेले संकट ओळखले होते. The Orion सारखे सारखे ग्रंथ टिळकांनी लिहून हे राष्ट्र जीवन हजारो वर्षे जुने व सातत्यपूर्ण आहे हे सांगितले व आर्य आक्रमण तसेच राष्ट्र संक्लपना स्पष्ट केली.
योगी अरविंदांनी राष्ट्र ही सांस्कृतिक कल्पना मांडली व ती स्विकारली गेली. त्या रांगेत स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता, तेजसूर्य सावरकर व अंततोगत्वा डॉ केशव बळीराम हेडगेवार यांनी अनेकविध अंगांनी ही राष्ट्र संक्लपना पुष्ट केली. परिणामस्वरूप स्वातंत्र्य संघर्ष यशस्वी झाला व फक्त सत्तांतरच नाही तर संघर्ष हा सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या यशस्वी आविष्काराने झाला.
पण स्वातंत्र्योत्तर काळात वैचारिक विकलांग केंद्र सरकार मुळे डाव्यांचा संघटित बौध्दिक झुंडशाहीचा सामना हा देश व समाजाला करावाच लागला. पण तो पर्यंत हिंदू समाज संघटित होत होता व डावे बौध्दिक विकलांग होत गेले. शास्त्रे प्रगती करत होती व त्यामुळे दाबून ठेवलेली सत्य बाहेर पडू लागली होती.
शैक्षणिक अभ्यासक्रमात जरी मुस्लिम इरा, ब्रिटीश इरा असा इतिहास वाटला तरी एक पानी शिवाजी महाराज इतिहास, राणा प्रताप यांच्या इतिहासाने स्वतंत्र भारतातील विद्यार्थांवर जे गारूड घातले ते पुस्तकभराच्या मुस्लिम आक्रांतांच्मा इतिहासाने घातले नाही.
राष्ट्रीय विचारांच्या द्रष्ट्यांनी जे वैचारिक काम केले व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे संघटनात्मक काम केले त्यामुळे इतिहास सत्यप्रकाशात पहाणे या तरूण पिढीला शक्य झाले. कसे ते पुढील लेखांपासून पाहू यात.
सुनील देशपांडे
Article (129/n)
Comments
Post a Comment