भारतीय इतिहास सत्यप्रकाशात.

लेखांक १२९


इतिहास हा भविष्यासाठी वर्तमान घडवत असतो. व त्यामुळे तो इतिहास वस्तुस्थिती निष्ठ व सत्य असावा लागतो. तसेच प्रेरणादायी सुध्दा असावा लागतो.


इतिहास व तदानुशांगिक शास्त्रे ही अशास्त्रीय तत्वज्ञान असलेल्या मार्क्सवाद, मानणार्या डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या कह्यात राहिल्याने पुस्तकातून राष्ट्रीय विचाराला तिलांजली मिळाली होती, तरीही आपापल्या क्षेत्रातील राष्ट्र पुरूषांचा इतिहास हा नीट अभ्यासून, तो गद्य पुस्तक, काव्य, नाट्य अशा अनेक प्रकारे तरूण पिढी पर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न सुरू झाले. शिवचरित्र हे आयुष्य ध्येय बनवलेले शिवकथाकार गल्लीबोळातून शिवचरित्र घेऊन गेले. शिवाजी आमचे प्रेरणास्थान तर औरंगजेब हा कृरात्माच हे सामान्य माणसाला कळू दिले . व मागील एका लेखात आपण शिवराज्याभिषेक त्रीशताब्दी सोहळा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रव्यापी सणच बनवला हे आपण पाहिले. तसेच महाराणा प्रताप हे मेवाडचे न राहता देशाचे बनले. लाचित बडफुकन आसामी योध्दा न रहाता, औरंगजेबाला आसामात प्रवेश करू न देणारा देशभक्त, देशाला आपला वाटला.


इतिहास तरूण मनात सांभाळून मग अभ्यासाने इतिहास समित्यांवर धडका मारू लागला. व सत्ताधाऱ्यांना धाक वाटू लागला. छत्रपती शिवाजीराजे एक पानांत व मुघल आक्रमकांच्या सनावल्या पाठांतरासाठी हे तरूण मनाला पटेना. इतिहास संशोधकही उभे राहू लागले. इतिहास पुर्नलेखन समित्या इतिहासावरची डावी जळमटे ओरबाडून काढून टाकू लागले व लख्ख इतिहास समोर येऊ लागला. सत्तांतराने तर एकमेव शहामृगी पवित्रा घेतलेले शासनाचे खोटेपणाला असलेले कवच दूर झाले व इतिहास प्रेरणा देणारा ठरला. सुभाषचंद्र बोस गुन्हेगाराच्या शिक्यातून बाहेर पडले. तर १८५७ चे स्वातंत्र्य समर हा ऐतिहासिक दस्त मान्य झाला.


भारतीय इतिहासाने मान्य केले कि भारत एक राष्ट्र, एक समाज, एक संस्कृती आहे. राम, कृष्ण हे या देशाचे ऐतिहासिक महापुरुष आहेत व ही एक सनातन संस्कृती आहे.


असेच सर्वच विषयांबाबत घडत गेले. वैचारिक पृष्ठभूमि,व  संघटित समाज याने स्वातंत्र्योत्तर काळात हे शक्य केले. इतरही क्षेत्रातील परीवर्तन असेच अभ्यासू या, पुढील लेखांमधून.


सुनील देशपांडे
Article (130/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन