विकृतीकरणाचा निर्णायक पराभव

लेखांक १३०


जसा इतिहास या विषयाचा राष्ट्रीयत्वाविरूद्ध गैरवापर चालू होता व तो गैरवापर ज्यांच्या नेतृत्वाखाली चालू होता त्यांचे एकूणच योगदान व बौध्दिक लबाडी विद्वत जनांनी, समाजाने, सोशल मिडीयाने उघडी पाडल्याने आता राष्ट्रीयत्व हे इतिहासा अडून प्रश्नांकित करण्याची क्षमता संपली आहे हे या स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षाचे मोठे यश आहे.


तसेच काही शास्त्रांचा सामान्य माणसांशी थेट संबंध येत नसला तरी त्या शास्त्रातील निष्कर्ष हे समाजावर विपरीत व विकृत परिणाम करत असतात. अशा काही शास्त्रशाखा म्हणजे जशी मानववंशशास्त्र, पुरातत्त्व, इंडाॅलाॅजी, भाषाशास्त्र व. या सर्वांचा वापर दीर्घकाळ वरील दृष्ट हेतूने सुरू होता.


वर्षानुवर्षे आम्ही आर्य बाहेरुन आले, येथे इंग्रजपूर्व राष्ट्र नव्हते, एक संस्कृती नव्हती. हे एक मागास समाजजीवन होते, असे अधिकृतपणे शिकत आलो होतो. बालपणापासून, शालेय शिक्षणापासून हे चालू होते.


या सर्वांसाठी आधार होता वरील शास्त्रे. पण समाज स्वतंत्र झाल्यावर मूळात जाऊन सत्याचे उत्खनन सुरू झाले. संघटित समाज स्वत्व शोधू लागला. अभ्यासक, विचारवंत जे एकांडे प्रयत्न करत होते, त्यांच्या संशोधनाला समाजात स्वीकृती येत गेली व पाठ्यपुस्तकातील गाळीव असत्ये बाहेर निघाली. 


प्रत्यक्ष संशोधन प्रमाणित करू लागली कि हे सनातन राष्ट्र जीवन आहे. सर्व शास्त्रांमधील आधुनिक संशोधनांनी, जगभरात बौध्दिक व्यभिचाराने संशयाची भूते निर्माण केलेल्या अशास्त्रीय डाव्या विचारांचा निर्णायक पराभव केला.
हरीभाऊ वाकणकरांच्या या संशोधनाने जगभर भारताच्या पुरातत्त्व शास्त्रातील संशोधन क्षमतेला मान्यता मिळाली.

हरीभाऊ वाकणकरांचे भीम बेटका चित्रशिल्पांच्या शोधापासून, सरस्वती नदी शोधा पर्यंतचे काम हे मैलाचे दगड ठरले. आपण असेकसे या दृष्ट प्रचारकी विद्वत्तेला फसलो असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. पण राखीगढी संशोधनाने तर या सर्व विकृत Theories ना मूळापासून गाडून टाकले. It was last nail in coffin.


असेच कलाक्षेत्रात सुध्दा घडत होते. तेथे काय घडले व ते आत्मसन्मानित समाजाने कसे प्रत्युतरीत केले ते पुढील लेखांमधून पाहू यात.

सुनील देशपांडे
Article (132/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन