अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी समाज संघर्ष
लेखांक १४१
समाज माध्यमे ही ही अभिव्यक्ती व्यासपीठ म्हणून सामान्य पण समंजस, अभ्यासू, तार्तिक व्यक्तिंच्या हातात आली. व कोणतेच धरबंध नसलेले विद्वान हे स्वतः ची मते सत्य म्हणून मांडून प्रतिवादाला आवकाश न ठेवता ज्या Ivory Tower मध्ये बसले होते, त्यांचे असत्याचे बुरखे टराटरा फाटू लागले.
आधी स्वतः च्या कह्यातील मेन स्ट्रीम मिडीया माध्यमातून ही मंडळी व्यक्त होत असत. पण त्याचा वाचक व प्रेक्षक आटल्याने व बाहेर सामान्य माणूस सत्य व ज्ञान व व्यवहारीक शहाणपणाची शस्त्रे घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई लढत असल्याने त्यात उतरणे या विचारवंतांना भाग पडले.
ट्वीट मागे घेणे, पोस्ट काढून टाकणे, वृत्तपत्र सेवेने रोज माफीनामा लिहिणे सुरू केले. कारण सत्याची वाफ दाबून ठेवणे आता शक्य नव्हते.
सत्याचा अनेकांगी आविष्कार सुरू झालाच, त्याच बरोबर प्रतिबंधात्मक कारवायाही सुरू झाल्या. चेहरा नसलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य बरोबर घेऊन समाजाला, लबाडी विरूद्ध शठं प्रति शाठ्यं ही लढाई पण खेळायची होती.
हुसेन हे देवीचे नग्न चित्र काढत असतील तर त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रेषितांचे चित्र काढण्याची परवानगी देते का? हा बिनतोड प्रश्नही विचारला. अता कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सुध्दा बौध्दिक लबाडी पासुन मुक्त करण्यात आले.
सहिष्णुता ही लाचारी नाही व कलेची अभिव्यक्ती स्वतंत्रता ही तत्वज्ञान म्हणूनच स्वीकारली तरच ते मूल्य ठरते हे समाज माध्यमाच्या धुरीणींनी म्हणजे पूर्ण समाजाने ह्या शहामृगी पवित्र्यात बसलेल्या विचारवंतांना समजावून सांगितले.
समाजाने समाजाला कलेचे सुंदर आविष्कार दिले, अनेकविध विषयाचे ज्ञान दिले. राखीगढी उत्खनन सामान्य माणसाला प्रथमच रोमांचित करणारे ठरले, सिंधूच नव्हे तर सरस्वती संस्कृती हे सत्य पण समजले. तरूणांना आडवळणावरील भीम बेटकाची चित्रशिल्पे साद घालू लागले. चित्रकार स्वतः चे चित्र व कला समजावू लागले.
ही ताकद मूलतः अभिव्यक्ती प्रिय समाजाने शस्त्र म्हणून व सृजनता म्हणून स्वीकारले व आज स्वातंत्र्योत्तर भारतात कलाक्षेत्रातील कुंठित अभिव्यक्ती उत्स्फुल्लपणे वाहू लागली.
यातीलच तिस-या पैलूचा विचार पुढील काही लेखांमधून करून घेऊ यात.
सुनील देशपांडे
Article (142/n)
Comments
Post a Comment