वैचारिक एकारलेपणाची वाताहात
लेखांक १४४
जी प्रक्रिया समाजामध्ये सहजपणे समाजाने सातत्यपूर्वक करावयाची असते ती प्रक्रिया या वैचारिक झुंडीने सत्ताधीशांच्या मदतीने करण्याचा प्रयत्न केला कि सामान्यपणे ज्या सत्तेला अधिकार दमन हा रोग असतो. पण एकदा तो मार्ग स्विकारल्यानंतर त्या सत्तेच्या उलथापालथी मध्ये स्वतः चे स्वत्वही गमावून बसावे लागले. हैवही जाते व दैवही. अशी अवस्था आमच्या आहि रे गटातील विचारवंत गटाची झाली.
२०१४ साली सर्वंकष सत्तांतर झाले. आज पर्यंतच्या आधुनिक भारतात निवडणूकीच्या आधारे संपूर्ण वेगळ्या तत्वज्ञानावर उभे असे परीवर्तन २०१४ साली भारतात प्रथमच घडले.
असे सर्वंकष राजकीय परीवर्तन होईल असे कोणाही विचारवंत कंपूला वाटले नव्हते. त्यामुळे असे घडले तर? हा विचारच केला गेला नव्हता. व अभेद्य अशी सत्तेची कवचकुंडले लेऊन आपण आपला वैचारिक Ivory Tower सांभाळून ठेऊ असे वाटत असतानाच ती कवचकुंडले गळून पडली.
आमच्या वैचारिक क्षेत्राची एवढी कुंठीत अवस्था आली होती कि जो विचार कधीही रूजू द्यायचा नाही, फोफावू द्यायचा नाही, जगू टिकू द्यायचा नाही, त्या विचाराचा अभ्यास सुध्दा केला गेला नाही. त्याची बलस्थाने, मर्यादा याचा विचार केला गेला नाही. परदेशी ज्या पध्दतीने वैचारिक विश्व चालते तेवढेच सत्य मानले गेले व संकुचित वैचारिक झुंडीला डोळ्यासमोर काजवे चमकू लागले.
अशावेळी काय काय घडले ते पुढील लेखांमधून पाहू यात.
सुनील देशपांडे
Article (145/n)
Comments
Post a Comment