संपूर्ण परिवर्तन व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
लेखांक १४५
सर्वंकष सत्ता परिवर्तन झाले. वैचारिक परिपुष्टता करणा-या सर्व सरकारी संबंधित संस्थांवर बसून स्वार्थ व परमार्थ करणा-या या वर्गाला सत्याबाबत शहामृगी पवित्रा घेऊन जगण्याची इतकी सवय झाली होती कि बाहेर परिवर्तनाची पहाट झाली आहे हेच मुळी त्यांना कळले नाही. जसे समाज माध्यमे व त्यांची ताकद व स्वतः ची संपलेली विश्वासार्हता यांचा या विचारवंतांना अंदाज नव्हता, तसेच संपूर्ण राजकीय परिवर्तनाचे बाबतही कळले नाही.
पण सत्य तर समोर आ वासून उभे होते. पण याचा स्वीकार करून स्वतःच्या भूमिकांची पुनर्बाधणी करण्या ऐवजी जनता मताचा अनादर करण्याचा प्रयत्न झाला. ज्या संवेदनशील कला, साहित्य क्षेत्राने सर्वाधिक संवेदनशील पाहिजे होते, त्याच धुरीणी आपला पराभव समजून घेण्याऐवजी खापर फोडायला दगड शोधत बसले.
पण बहुसंख्यांक समाजाला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. समाजाला, कलेला, साहित्याला, या सर्वांनाच. अन्यायाचे परिमार्जन कसे करायचे हे हि काम ही क्षेत्रे व त्यातील सर्व उपेक्षित दिग्गज व सामान्य माणसे करू लागली.
कलेत राष्ट्रवादाचे, संस्कृतीचे, पूर्वापार परंपरांचे सकारात्मक प्रदर्शन, महान भारतीय दर्शनांविषयी स्वाभिमान ह्या गोष्टी तद्दन टाकावू न रहाता ते कलाविष्कार सुध्दा तेवढेच महत्त्वाचे व महानही असतात हे समाजाने व सरकारने सुध्दा स्वीकारले.
या क्षेत्रांमधील दुर्लक्षितांनासुध्दा प्रतिष्ठा प्राप्त झाली.
यातील परिवर्तन आपण समजून घेऊ पुढील काही लेखांमधून.
सुनील देशपांडे
Article (146/n)
Comments
Post a Comment