एकारलेल्या विचारधारांचीं राजकीय कोंडी
लेखांक १४६
कला क्षेत्रावर एकारलेल्या विकृत विचारधारा मानणा-या समुहाचा जो भयानक व विकृत प्रभाव होता त्यामुळे समाजाची सदिच्छा व चांगुलपणा वरचा विश्वासच उडाला होता.
सहनशीलता हा दोष वाटावा इतक्या टोकाला विकृती पोहोचली होती. चित्रकार हुसैन यांच्या स्वाभाविक विकृती विरुद्ध जनक्षोभ उभा राहिला. विचारवंत कंपू विसरला होता कि परिस्थिती पूर्ण बदलली आहे, व त्यामुळे कलाकारही हुसैन यांच्या विरोधात उभे राहिले. कलाकारांनाही या निवडक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात उभे रहावे असे वाटू लागले. जागृत समाजाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खोटा मुखवटा घेतलेल्यांना समजून दिले कि अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना, तरच कलाकाराला व एवढेच नाही तर अभिव्यक्ती यापुढे selective नाही तर सर्वांसाठी समान असेल तरच तुम्हाला मिळेल.
लोकांनी, एकारलेल्या विचार धारेला, आता लबाडी करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी खेळू देणार नाही हे ही स्पष्ट केले.
तीन तलाक, हलाला हे कथांमध्ये डोकवू लागले तर चर्चमधील अनैतिकता, व भ्रष्टाचार यांना ही कथा, समाज माध्यमे यात जागा होऊ लागली.
भरकटलेल्या एकारलेल्या विचारधारांवर पुष्ट झालेल्या विचारवंत कंपूला भ्रम होऊन मोदींविरोधात लढाई व व्यूहरचना रचना सुरू झाल्या व अंतिम पराभवाकडे वाटचाल सुरू झाली.
कारण स्पष्ट होते कि मोदी हे संपूर्ण समाजाच्या इच्छाशक्तीचे प्रतिक होते. मोदींविरोधात लढाई म्हणजे ती इच्छाशक्तीच नाकारणे होते. व म्हणून पराभव नक्की होता.
हिंदू समाजाची गेली दिड दोनशे वर्षे जी वैचारिक मानहानी चालू होती, त्या विरुद्ध हा नृसिंह अवतार होता पण ते यांना कधी समजलेच नाही व या कंपूने शहामृगी पवित्रा सोडला नाही. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सर्वात जागृत, नव्हे हे बाळकडूच ज्यानी जगाला दिले त्या जागृत हिंदू समाजाने या एकारलेल्या, हुकूमशाही वृत्तीच्या एकारलेल्या विचारधारेला या अभिव्यक्ती मूल्याचा खरा अर्थ समजावून दिला.
हे कसे घडले ते पुढील लेखांमधून पाहू यात.
सुनील देशपांडे
Article (147/n)
Comments
Post a Comment