वैचारिक संघर्षात झुंडीची कोंडी

लेखांत १४७

मुळात संघर्ष राजकीय नव्हता तर विचारधारेला होता पण त्या राष्ट्रीय विचारधारेची ताकद इतकी जास्त होती व हजारो वर्षांपासून सिध्द होती कि ती समूळ नष्ट करणे कोणालाही शक्य नव्हते. या एकारलेल्या, अपरिवर्तनीय विचारधारांना ते शक्यच नव्हते. 

त्यामुळे राष्ट्रीय विचारधारेला वैचारिक संघर्ष करून पराभूत करणे हे यापैकी कोणालाही शक्य नव्हते. अशा वैचारिक संघर्षाला जी सर्वसमावेशक मानसिकता लागते तीच मुळी नसल्यामुळे वैचारिक संघर्ष व त्यातून विजय ही शक्यताच संपली. व मग परत सुरू झाला संघर्षाचा सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न. सुरवातीला सरकारी दमनशाहीची मदत हे शस्त्र वापरले जात होते, ते शस्त्र २०१४साली निकाली निघाले. मग वैचारिक संघर्ष शक्य नसल्याने सोप्या मार्गाने प्रवास सुरू झाला.

राजकीय विरोध उभा करायचा, सामाजिक प्रश्न निर्माण करायचे, कलाक्षेत्रातील स्वातंत्र्य, मानवाधिकार, अशी शस्त्रे बाहेर काढायची हे खेळ सुरू झाले.

व येथेच फसगत सुरू झाली. ज्या विचारा विरूध्द संघर्ष करायचा, ते बाजूला राहिले. पण तो विचार तर केंद्र स्थानी आला होता व त्याला फारशी गरज नसली तरी सत्तेची कवचकुंडले पण जोडीला होती. सत्तास्थान वैचारिक विद्वेषाला ओळखत होते.

व त्यामुळे सत्तास्थान निर्णय घेऊ शकत होते व समाजमनाला ते निर्णय आपले वाटत होते. त्यामुळे निर्णय परिणामकारक ठरू लागले.

हे निर्णय व समाजमनाच्या आकांक्षा यांची सांगड व समाज अभिव्यक्त कसा होतो याचे प्रात्यक्षिक या एकारलेल्या विचारधारांना व वैचारिक कंपूला होऊ लागले. कसे ते पुढील लेखांमधून पाहू यात.

सुनील देशपांडे
Article (148/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन