सत्ता व समाजातील वैचारिक एकात्मता

लेखांक १४८


ज्या पद्धतीने या एकारलेल्या विचारधारांनी वैचारिक लढाई ही राजकीय बनवली त्यामुळे या विचारधारा वैचारिक लढाई पण हारल्या व राजकीय सुध्दा.


या विचारधारांची मूळ चूक ही झाली कि राष्ट्रीय विचारधारेचा हा विजय नसून एका पक्षाचा, त्याच्या नेत्याच्या प्रभावाचा व आपण ज्यांच्या वळचणीला बसून ही वैचारिक चबढब करत होतो त्या पक्षाच्या ना कर्तेपणाचा हा पराभव आहे. यालाच शहामृगी पवित्रा म्हणतात. ‌जे दिसत ते नाकारून जी इच्छा आहे तीच खरी मानायची. पण परीणाम स्वरूप संपूर्ण पराभव पदरी पडला.


जर विचारधारा, कार्यपध्दती याचा हा सातत्यपूर्ण विजय आहे हे समजून घेतले असते तर बरच काही सावरता आले असते. पण सद्य परिस्थितीत समाज राजकीय पक्षाच्या वळचणीला नसून त्याच्या म्हणजे समाजाच्या स्वतंत्र अपेक्षा आहेत व तो त्या  सत्तेला पूर्ण करण्यासाठी भाग पाडत आहे.हे जाणले असत तर संघर्ष उथळ झाला नसता.


पण व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे या विचारधारेत दडपले जाईल  असे ठरवून स्वतः च्या विचारधारा हुकूमशाही तत्वांवर आधारित असूनही मोदी हे नेते व हिंदू हा समाज हा हुकूमशाही आणणार असे गृहितक आखून संघर्ष सुरू केला.


अस्तित्वात नसलेला अल्पसंख्याक अन्याय, अस्तित्वात नसलेली कलेची मुस्कटदाबी, अस्तित्वात नसलेली हुकूमशाही या आधारे संघर्ष सुरू केला. कर्कश्य केला.


कुणीतरी अखलाक जमावाकडून मारला गेला तर वैचारिक कंपूतून अवार्ड वापसी सुरू केली. आपल्याच समाजाने सर्वस्वी नाकारलेल्या मुखंडाकडून  संबंध नसलेल्या नेतृत्वावर हल्ला करून संघर्ष सुरू केला. 


पण समाज सावध होता. हे सरकारला का घेरत आहेत हे त्याला कळत होते. व सरकार ऐवजी समाजाने संघर्ष  हातात घेतला. समाज माध्यमे हातात घेऊन या राजकीय हेतूने सुरू केलेल्या संघर्षाला परत वैचारिक मैदानात आणले.


अवार्ड वापसी वाल्यांचे हिशोब दिले. हा अपप्रचार आहे व पराभव स्विकारण्याची खिलाडूवृत्ती नाही या विकृतीमधून आला आहे हे सर्वांनाच पटवून दिले.


आपण हल्ला तर सरकार वर करीत आहोत पण आक्रमणं तर समाज करीत आहे. हे कोडे काही सुटत नव्हते. व म्हणून हा दारूण पराभव पदरी पडत होता.


यातील समाज व सरकार यातील वैचारिक एकात्मता व समाजाचा निरक्षीरविवेक याचा विजय कसा झाला हे पुढील लेखामधून पाहू यात.


सुनील देशपांडे
Article (149/n)


Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन