अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे यश हे समाज उर्मीतच
लेखांक १४९
समाजाची वैचारिक अभिव्यक्ती म्हणजे सरकारची सुध्दा आहे हे ७५ वर्षात तशा अर्थाने प्रथमच घडत होते. त्यापुर्वी सरकारे समाजाला अभिव्यक्त करत नव्हती कारण सरकार एक, समाज बाजूला, तर वैचारिक नेतृत्व तिस-याच्या हातात रिमोट कंट्रोल द्वारा. त्यामुळे अशा सरकारांना बौध्दिक दृष्टीने घाबरवणे सोपे होते.
पण आता परिस्थिती पालटली होती. समाज वैचारिकदृष्ट्या सजग होऊन, स्वतः च्या वैचारिक भावना अभिव्यक्त करेल असे सरकार बनवण्यासाठी प्रयत्नशील होता व २०१४ साली त्याला ते पूर्णपणे जमले.
त्यामुळे सरकार त्याच्या म्हणजे समाजाच्या विचाराने चालू लागले. जे सुंदर कपड्या आडून वैचारिक वीष व समाजाच्या विजिगिषू वृत्तीवर हल्ला करीत असत त्याचा बंदोबस्त समाजानेच सरकारच्या मदतीने सुरू केला.
गाय हा भावनिक विषय, समाज बदनामीसाठी वापरू देण्यास विरोध सुरू केला व भावभावना या शास्त्रीय संज्ञापना आहेत हे ठणकावून सांगितले. योगा हे प्रगत समाजाचे लक्षण आहे हे सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे यापुढे निवडक नसणार हे ही स्पष्ट केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही मूलभूत राष्ट्रीय एकात्मतेशी तडजोड म्हणून वापरू दिले जाणार नाही हे ३७० रद्द करून व फुटीरतावाद मोडून काढून स्पष्ट केले.
हे निर्णय राजकीय वाटतात पण समाजाने आपली वैचारिक गरज या माध्यमातून पूर्ण केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा स्पष्ट केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे बेजबाबदार झुंडशाही नाही हे सरकारने नव्हे समाजाने बजावले.
भाषण ठोकायला परवानगी आहे, नव्हे तो हक्कच आहे पण पुण्यातील एल्गार परिषदे आडून भारतीय संविधान नाकारणे व व्यवस्थेविरुद्ध लढाई पुकारणे या नक्षली विचाराला जेरबंद केले समाजाने, सरकारने नव्हे. सरकारने फक्त प्रशासकीय जबाबदारी पार पाडली. म्हणून लक्षांत आले कि समाजाच्या वैचारिक गरजा भागविण्यासाठी ज्यावेळी योग्य सरकार समाजाने आणले त्यावेळी यामागे किती ताकद उभी रहाते याचा अंदाज या वैचारिक कंपूला आला नाही.
पण समाजाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपलेच आहे व त्याचा योग्य अर्थ ह्या एकारलेल्या विचारधारांना नीट समजावून दिला. ख्रिश्चॅनिटी, इस्लाम व कम्युनिझम यांना समजावून दिले कि अभिव्यक्ती महात्म्य हे भारतीय तत्त्वज्ञान व विचार शृंखलेमुळे जगात आहे व ते येथे शिकवायचे नसून शिकायचे आहे.
थोडा लांबला तरी या वरवर न जाणवणा-या विषयाचा प्रभाव स्वतंत्र भारतावर फार होता, म्हणून हे परिवर्तन स्पष्ट करणे गरजेचे होते.
सुनील देशपांडे
Article (150/n)
Comments
Post a Comment