सर्वंकष राजकीय परिवर्तन व समाज

लेखांक १५०


ज्यावेळी समाजाच्या अपेक्षा व सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती एक होते त्यावेळी काय घडू शकते हे २०१४ सालापासून भारत अनभवू लागला तर जग पाहू लागले.


समाजाच्या इच्छा, आकांक्षा व त्यासाठी केलेला संघर्ष व राजसत्ता ही समाज बांधिल असेल तर शिक्षण, इतिहास, कलाक्षेत्रातील विकृत हुकूमशाही कशी मोडून काढली जाते हे आपण मागील काही लेखांमधून पाहिले आहे.


पण समाजाच्या सार्वभौम राष्ट्र म्हणून ज्या अपेक्षा असतात व त्या अपेक्षांची पूर्तता सत्ताधारी कसे करतात याचा नाविन्यपूर्ण अनुभव भारतीय समाज २०१४ पासून करून घेत आहे.


तत्पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा विषयी कामे होत होती पण स्वतंत्र होणा-या समाजाला ज्या उपेक्षांना पारतंत्र्यात समोरे जावे लागते, त्याचे परिमार्जन होणे हे अधिक गरजेचे वाटत असते. व या आपल्या देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात तर हा पारतंत्र्याचा कालावधी हाच मुळात फक्त १५० वर्षाचा ठरवला गेला कि जो भारतीय समाजासाठी हजार वर्षांचा होता.


इस्लामी आक्रमणे ही भारताच्या पारतंत्र्यात मोजणेच इतिहासातून पुसण्यात आली. परंतू समाज तर तोच सनातन समाज होता व तो अथक हजार वर्षे आक्रमकांशी झुंजत होता व त्याला अचानक १५ आॅगस्ट १९४७ साली इतिहासाचे क्रमिक पुस्तक सांगू लागले कि पारतंत्र्य म्हणजे फक्त इंग्रज.


 येथ पासून या समाजाच्या इच्छा आकांक्षा व सत्ताधाऱ्यांच्या कल्पना यात परस्पर विरोध निर्माण झाला. वाटा बदलल्या. अपेक्षाभंगाने दग्ध समाज राजवट बदलली एवढाच अर्थ घेऊ लागली. हतोत्साही समाज हा किती निष्क्रिय व आपमतलबी, ध्येय शून्य बनतो, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारत व भारतीय समाज बनला होता.


पण भारतीय समाज हा कधीच सरकारावलंबी नसल्याने आपल्या आशा अपेक्षा पूर्तीसाठी स्वतः च प्रयत्न करू लागला.


२०१४ सालापासून त्याला राजकीय क्षेत्रात संपूर्ण यश येऊ लागले. त्याचा आढावा घेऊ पुढील लेखांमधून.


सुनील देशपांडे.
Article (151/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन