एनजीओ नावाचा मायावी राक्षस व जागृत समाज

लेखांक १५२


आपण स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांचे विविधांगी, पण समाजाच्या इच्छाशक्तीचे परिवर्तनाचे प्रयोग, समाजानेच संघटित होऊन कसे व्यवहारात उतरविले, ह्याचा धांडोळा घेतला आहे.


यातच असे अनेक बारीकसारीक कंगोरे असतात कि जे सलत असतात पण परिस्थिती अनुकूल झाल्याशिवाय समाजपुरूष त्यात दुरूस्तीची अपेक्षा करू शकतं नाही. असेच भारतीय समाजाचे ही झाले होते.


जसे इतिहास, कला, ज्ञान शाखा यांत अन्याय झाला व त्याचे परीमार्जन समाजाने संघटीत होऊन केले व स्वविचाराचे सरकार आल्यावर जोरकसपणे ते काम केले. तसेच या समाजावर अन्याय करणारी आणखी एक व्यवस्था हेतुपुरस्सर अस्तित्वात आली होती. तिचे स्वरूप मायावी होते व त्यामुळे त्या विरूध्दचा संघर्षही साधा सरळ नव्हता.


त्यातील संघर्षाचा काही भाग समाज स्वतः करू शकत होता, पण काही आवश्यक गोष्टींसाठी सरकारी सहकार्य फार गरजेचे होते.


यातील जागृत समाजाने जो कार्यभाग करणे गरजेचे होते ते संघटित समाज सातत्याने ७५ वर्षे केले व २०१४ पासून सरकारला भूमिका घेण्यासही भाग पाडले.


हि व्यवस्था म्हणजे NGO's. अनेक अशासकीय समाज संस्था स्थापन केल्या जाऊ लागल्या, समाज उत्थानाचे हेतू सांगितले जाऊ लागले. व काही संस्था या शुद्ध हेतूने समाज प्रबोधन, सेवा करतही होत्या आणि आहेत. पण... या बरोबरीने समाज बदनाम करणे, हतोत्साही करणे, समाजघडी विस्कळीत करणे ह्याच उद्देशानी काम करणा-या संस्था पण मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या.


त्यांचे स्वरूप, समाज विघातक वर्तन व राष्ट्रीय समाजाने केलेला संघर्ष हे पाहू पुढील लेखांमधून.


सुनील देशपांडे
Article (153/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन