अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारताचे सनातन मूल्य

लेखांक १४२


समाजामध्ये ज्यावेळी एखादी  भावना ही दीर्घकालीन वा कायम स्वरुपी रूजवायची असते, त्यावेळी ती समाजात व समाजाबरोबर राहून रूजवावी लागते.


परंतू आधुनिक भारतातील विचारवंत, कलावंत ज्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आम्ही भारतीय समाजाला नवीनच देत आहोत कि जे या मागास समाजात कधीच नव्हते, असा आविर्भाव आणला होता, ते स्वतः त्यासाठी कोणत्याही खस्ता खात नव्हते व समाजात हे मूल्य प्रवाहित करण्याचा प्रयत्न करत नव्हते.


मूळात हे मूल्यच खरं तर त्यांना तत्वज्ञान पातळीवर मान्य नव्हते. पण भारतात जबाबदारी शिवाय अधिकार मिळवण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कला स्वातंत्र्य, सृजनशीलता ही हत्यारे बनवली गेली होती. पण भारताने हजारो वर्षांच्या राष्ट्रीय व सांस्कृतिक प्रवासातून हे मूल्य समाजात नीट रूजवले होते. व्यक्ती व समाज यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मूल्य रूजण्यासाठी व्यक्ति व समाज याला आत्मसन्मान आसावा लागतो. त्यामुळे भारतीय तत्वज्ञानाने समाजात व व्यक्तिमध्ये हजारो वर्षांपासून हा भाव जागा केला व परीणामतहा समाजात एकमेकांच्या स्वातंत्र्याचा सन्मान होता.


पण या नवागतांनी अभिव्यक्ती मूल्य रूजण्यासाठी उपाय शोधला तो कायमस्वरूपी नाही तर थातुरमातुर मलमपट्टीचा.


तो कोणता ते पुढील लेखांमधून पाहू यात.


सुनील देशपांडे
Article (143/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन