NGO's नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा
लेखांक १५३
सर्व साधारणपणे समाजातील दुर्बल घटक यांना न्याय, आधार मिळावा, त्यांची समाजाच्या उदारतेच्या आधारे सेवा व्हावी, दुरितांचे दुःख दूर व्हावे यासाठी स्वतः हून कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्ति समुहाने स्थापन केलेल्या या स्वयंसेवी संस्था असतात. म्हणजे तशी अपेक्षा असते.
पण भारतात व ब-याच अंशी जगातही असे गोंडस रूप धारण केलेल्या स्वयंसेवी संघटना म्हणजे जागतिक विकृत विचारधारांच्या रावणाच्या कह्यातील मायावी मारीच असतात.
यांचा काळा इतिहास हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. पण संत मदर टेरेसा यांची सेवा कार्ये, अर्भक विक्रिचा खेळ करणारी अर्भकालये, पर्यावरणवादी ग्रेटाचे नको त्या विषयावरील टूलकिट, मलालाच्या सेवाभावी चेह-या अडून काश्मीर प्रश्नावर दखल देणे, लष्कर, पोलिस यांच्याविषयी अप्रिती निर्माण करण्यासाठी मानवाधिकार अधिकाराचा बागोलबुवा उभा करणे. असे एक ना अनेक उद्योग देश, त्यातील समाज, स्वस्थ जीवन उध्वस्त करण्यासाठी प्रयत्नशील असतात.
नक्षलवादाचे, हिंसेचे, अराष्ट्रीय आंदोलनांचे मानवतावादी बुरख्या आडून समर्थन केले जाते. दलित बांधवांचे शिरकाण करणा-या नक्षलवाद्यांना पाठिशी घातले जाते. मदरसे व ख्रिश्चन बाल संगोपन केंद्रे तर मानवी विकृतीची जिती जागती उदाहरणे आहेत.
यादी वाढवली जाईल. पण त्याची आवश्यकता नाही. भारताने समाज म्हणून गेली ७५ वर्षे व २०१४ नंतर सरकार कडून या पंचमस्तंभी स्वयंसेवी संस्था विरूद्ध युद्ध छेडले.
कसे यशस्वीपणे लढले ते पुढील लेखामध्ये पाहू यात.
सुनील देशपांडे
Article (154/n)
Comments
Post a Comment