समाज माध्यमे social media व अभिव्यक्तीचे सार्वत्रिकीकरण .
लेखांक १४०
एकारलेल्या वैचारिक झुंडीला व त्यांच्या आश्रयदात्या सत्ताधिशांना जसे समाज संघटन या विषयी पूर्ण अज्ञान होते तसेच त्यांचा समाज माध्यमाच्या अभिव्यक्ती शक्तीचा अंदाज सुध्दा पूर्ण चुकला.
तंत्रज्ञानाचे असाधारण महत्त्व नाकारून, त्याच्यावर उथळपणाचा आरोप व खरेपणा विषयी संशय व्यक्त करून भागेल असा स्वतः च स्वतः चा भ्रम करून घेऊन समाज माध्यमांकडे दुर्लक्ष केले. पण या क्षेत्राची ताकद पूर्ण वेगळी होती. व परीवर्तन हा सहज स्वभाव असलेल्या समाजाने हे ओळखले होते. व त्याचा अभिव्यक्त होण्यासाठी पूर्णशक्तीने उपयोग सुरू झाला.
समाज माध्यमे या पोपटाचा प्राण आहे, कोणालाही अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य. आज पर्यंतची अभिव्यक्तीची माध्यमे ही मर्यादित होती. त्यामुळे सामान्य माणसाला अभिव्यक्त होऊ द्यायचे कि नाही, किती? याचा निर्णय मूठभरांना करणे शक्य होते. वर्तमानपत्रात फक्त पत्र छापून येईल पण लेख नाही. सामान्य माणसाला अभिव्यक्त होण्यासाठी लेखन स्वातंत्र्यावर अघोषित मर्यादा होती. सिनेमा तर परिघा बाहेरचीच गोष्ट होती. चित्रकाराच्या चित्राचे रसग्रहण करणा-या मर्मज्ञाच्या वैचारिक मान्यतेत आलात तर आपण चित्रकार व पुस्तक गुणवत्ता ठरणार वैचारिक झुंडीच्या वैचारिक कलात तुम्ही बसलात तर? यातून कला कशी मुक्तपणे अभिव्यक्त होणार?
व ही आहे समाज माध्यमांची स्वातंत्र्य प्रेमी ताकद. मला लिहायचे आहे, मी समाज माध्यमांवर टाकले व कोणीतरी वाचले. मी समाधानी झालो. स्वांत सुखाय, हा अनुभव प्रत्येक व्यक्ती घेऊ शकते. ही ती ताकद आहे. झारीतले शुक्राचार्य नष्ट झाले. माझ पेंटिंग, माझी कविता, माझी अभिव्यक्ती व असे कोट्यावधी साधक स्वतंत्र झाले. कला मुक्त झाली.
लोकांना प्रश्न पडायला लागला कि लोक आता सत्तांतर झाल्याने बोलू लागले का? तर नाही. लोकांच्या मनात होते पण पण व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य या वैचारिक झुंडींनी रोखले होते, ते आता स्वतंत्र होत आहे व तो आवाज आता सर्वांपर्यंत पोहोचवा जात आहे.
याचेच अजूनही पैलू पाहू पुढील लेखांमधून.
सुनील देशपांडे
Article (141/n)
Comments
Post a Comment