परकीय तत्वावर पोसलेल्या NGOS

लेखांक १५४


एकारलेल्या विचारधारांच्या प्रचार व त्यांचा हेतू यशस्वी करण्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे  ह्या स्वयंसेवी संस्था कार्यरत होतात. व या विचारधारा विरोधी जे असतील त्यांचे स्खनन करणे सुरू करतात.


सुरवातीला जरी हेतू समजला नाही तरी स्वातंत्र्योत्तर भारतात संघटित होणा-या समाजाला हे लक्षात येऊ लागले. मग पुर्वांचलातील ख्रिश्चन स्वयंसेवी संस्थाचे राष्ट्रीय एकात्मता विरोधी चळवळीला वैचारिक व धनाने सहकार्य असेल, बंगाल मधील बुध्दीजिवींचे चिनी प्रेम असेल, मूल निवासी सारखी आंदोलने असतील, नावे बदलून पण देशाच्या ऐक्याशी खेळ आहे हे समजू लागले.


समाजाच्या लक्षांत आले कि स्वतंत्र भारतात रक्षति स्म परस्परं या भावनेने समाजानेच समाजातील दुर्बल घटकांचे रक्षण केले पाहिजे.


संघटित समाजाने दुर्बल घटकांना जवळ घेऊन दुखितांचे अश्रू पुसून सहकार्य करण्यास सुरुवात केली. वनवासी बंधु, दलित बांधव, यांच्यात असंख्य संस्थाच्या आधाराने कामे सुरू केली. व पहाता पहाता या एकारलेल्या विचारधारांच्या स्वयंसेवी संस्थांचे पितळ उघडं पडू लागले. ५०/६० वर्षांच्या कालावधीत विवेकानंद केंद्र, वनवासी कल्याण आश्रम, एकल विद्यालये, धर्म जागरण यासाठी राष्ट्रीय विचारांची हजारो लोक स्वातंत्र्योत्तर भारतात बाहेर पडले व आज एकसंध पुर्वांचल आपल्यात आहे. वैचारिक पातळीवर नक्षलवादी एकटे पडले. कारण अनेक संस्था सुदूर जंगलात गेले, विश्वास जागवला व विद्वेषी स्वयंसेवी संस्थांच्या हेतूलाच सुरूंग लावला. त्याचवेळी शहरातील बुध्दीजिवी मानवतावादी विचारवंत व संस्था यांची काळी कृत्ये उघड करण्यास सुरुवात केली.


बघता बघता विघटनकारी स्वयंसेवी संस्था, परदेशी संस्थांचे हितचिंतक यांची अचूक माहिती समाजाला होऊ लागली. त्यातच समाज माध्यमे मध्यवर्ति भूमिकेत आली.


यावेळी २०१४ साली प्रथमच भारतीय समाजाच्या आशा आकांक्षांचे प्रतिक सरकार आले. व फक्त सामाजिक पातळीवरील संघर्षाला राजकीय सहकार्य मिळाले. 


भ्रष्ट मार्गाने अनैतिक, असामाजिक, अराष्ट्रीय कृत्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे हिशोब तपासणे, कारण मागवणे सुरू झाले व या संस्थाची रसदच तुटली.


ख-या स्वयंसेवी संस्थांनी मोकळा श्वास घेतला.


राजकीय परिवर्तनाचे स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्व आपणास या सर्वच क्षेत्रात लक्षांत आले.


आता समारोपाकडे.


सुनील देशपांडे
Article (155/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन