मनोगत
लेखांक १५७
या पार्श्वभूमीवर मी स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षे याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला.
स्वातंत्र्य म्हणजे इंग्रज घालवणे हे तुलनेने सोपे उद्दीष्ट स्वातंत्र्य लढ्यातील धुरीणींनी ठेवल्यामुळे हे राष्ट्र व हा समाज जी एक जिवंत एकक होती त्यांच्या इच्छा, आकांक्षा, ध्येय, संस्कार, जीवन उद्दीष्ट यांचा प्रचंड कोंडमारा झाला, त्यांच्यातील स्वत्वच मरणप्राय झाले. अशी आपल्या स्वातंत्र्य लढ्याची शोकांतिका होऊ लागली.
अर्थात याची जाणीव झालेल्या नेतृत्वाने अनेकविध मार्गांनी या चळवळीला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे त्या व्यक्ती, संस्था यांच्या भूमिका प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यातील प्रयत्नांच्या बरोबरीने महत्वाच्या होत्या व म्हणून त्या येथे विचारात घेतल्या.
यात योगी अरविंद, विवेकानंद, लो टिळक, डॉ हेडगेवार या सारख्या अनेकांचे चिंतन, त्याची आवश्यकता, स्वातंत्र्योत्तर भारतात त्यामुळे झालेले जागरण या सर्वांचा उहापोह अत्यावश्यक होता.
यातच फाळणी का टळली होती व का झाली याची उत्तरे येतात. स्वातंत्र्य प्राप्ती मध्ये समाज जागरणाचे महत्व व राष्ट्राच्या चितीची ओळख किती आवश्यक असते व त्याचे सकारात्मक परिणाम कसे दिसतात हे ही पहाणे आवश्यक होते.
त्यामुळे राष्ट्राचे स्वत्व, समाजाचे जीवन उद्दीष्ट, या संदर्भात समाज व समाज धुरीण यांनी जी वाट चोखाळली व त्याची गोंडस फळे आज आपण पहात आहोत त्याचा स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षाचा धांदोळा मी घेतला. माझ्यासाठी हे सर्वात महत्वाचे होते.
खुप महत्वाचे पण कदाचित अडगळीत पडेल असे वाटल्याने मी त्याला स्पर्ष केला. स्वान्त सुखाय हा निखळ हेतू असल्याने, कोणत्याही अपेक्षा नाहीत.
सुनील देशपांडे
Article (158/n)
Comments
Post a Comment