भारतीय बुध्दीवादासमोरील आव्हान

सलमान रश्दी या लेखकावर अमेरीकेत खूनी हल्ला झाला. तसाही हा लेखक गेली २५ वर्षे अज्ञातवासात जगत होता. भारतीयांनी फार गंभीरपणे घ्यावा असा साहित्यिक ही रश्दी नाही.

पण मिडनाईट चिल्ड्रन्स ही भारतासंर्दभात एक सामान्य पण भारतीय जनमानस रागवेल अशी कादंबरी लिहिल्यावर संतापाला तोंड द्यावे लागण्या ऐवजी प्रतिष्ठाच प्राप्त झाली. म्हणून त्याने पुढचं धाडसी पाऊल उचलले. Satanic verses. 

पण आता समस्या सामना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणा-या हिंदू, भारतीय समाजाशी नव्हता तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोडाच पण सामान्य सहिष्णुता ही नाही, सह अस्तित्व ही नाही तर परमत विकृत असहिष्णू, क्रूर इस्लामशी होता.

व जगाला विकृत एकारलेल्या इस्लामची आणखी एक ओळख झाली. वधाचाच आदेश व तोही एका राष्ट्र प्रमुखाकडून. ही झाली वस्तुस्थिती.

पण भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून सतत टीप गाळणाऱ्या बुध्दीवादी पुरोगामी स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष वर्गाला मात्र वेगळ्याच दुविधेचा सामना करावा लागत आहे.

सलमान रश्दीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कसा स्विकारायचा. जो पर्यंत Midnight Children पर्यंत होते, तो पर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य होते पण आता तर पंगा इस्लामशी होता. व आमच हे वैचारिक नेतृत्व नेहमी प्रमाणे गर्भगळीत झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सोवळे गळून पडलं. व धार्मिक भावना वरचढ ठरल्या. 

गेली २५ वर्षे हे पुरोगामी विश्व मूग गिळून बसले होते. हिंदू समाज व धर्म या विरूद्ध कोणी ब्र उच्चारला तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सनद घेऊन लगोलग मिडीयासमोर धावणारे, यावेळी मात्र शहामृगी पवित्रा घेऊन बसले होते.

पण आज कहर झाला. इतका दीर्घकाळ द्वेषाची कावीळ झिरपत ठेवणा-या इस्लाम विरूद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मानासाठी एक शब्द नाही.

हे दुतोंडी वर्तन हे भारतीय बुध्दीवाद्यांसमोरील मुख्य आव्हान आहे व दुविधाही.

सुनील देशपांडे
पुणे
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन