समारोपाकडे
लेखांक १५५
*समारोप*
भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होऊन ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. एखाद्या राष्ट्र जीवनासाठी हा कालखंड खूप मोठा नसला तरी मूल्यमापनासाठी फार लहानही नाही. त्या देशातील समाजाच स्वरूप व बदल अभ्यासण्यासाठी तर भरपूर आहे.
पण भारताचे स्वातंत्र्य हा एखाद्या छोट्या देशाला आक्रमकांनी सहज सोडून द्यावे एवढे साधे नाही. एवढा प्रगल्भ, प्रचंड, शक्तीशाली देश परतंत्र होतो कसा? व स्वातंत्र्य त्याला मिळते कसे हे ही औच्छुक्याचे व अभ्यासाचे ठरले आहे.
त्याच बरोबरीने स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षे झाली आहेत. त्यामुळे ह्या ७५ वर्षांचा धांडोळा घेणे तर अत्यावश्यकच आहे.
हा देश खंडप्राय आहे, वैविध्यपूर्ण आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, व अत्यंतिक वेगळेपणाचे अनेक गुण लेवून आहे.
त्यामुळे भारताचे ७५ वर्षे स्वातंत्र्याची, याचे सिंहावलोकन हे कुणा एकाचे काम नाही. एकेका पैलूने अभ्यास केला तरी अंगुष्ठमात्र अजून शिल्लकच आहे, असेच वाटेल.
म्हणून मी या सिंहावलोकनासाठी एक पैलू निवडला व तो या लेखांमधून उलगडण्याचा प्रयत्न केला.
हाच पैलू का निवडला हे पुढील लेखांमधून.
सुनील देशपांडे.
Article ( 156/n)
Comments
Post a Comment