समारोप
लेखांक १५६
*समारोप
या स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षात अनेक प्रकारे देशाची भौतिक प्रगती झाली. शाळा, महाविद्यालये, विशेष शिक्षण संस्था, अनेक मोठे उद्योग, शेतीतील आत्मनिर्भरता, आवकाश अभ्यासातील विस्मयकारक प्रगती, सुंदर व सुदूर अंतरापर्यंत रस्ते, मनोरंजनामध्ये आधुनिकता, संगणक व माहिती जाळात जगाच्या बरोबरीने प्रवास, हे असे व यातील प्रत्येक बारकाव्यावर अभ्यास करता येईल व तो होणारही आहे.
सामाजिक सुधारणा व त्यातील प्रगतीचा प्रवास, आपल संविधान व त्याचा प्रवास, व्यक्ती स्वातंत्र्य व व्यक्ती विकास याच्या लढ्याचा प्रवास असेही अनेक पैलूही अभ्यासले जातील.
मी काय विचार केला? इतिहास कायम महापुरुषांच्या पराक्रमाचा, परीश्रमांचा, असतो. पण त्या सर्वाच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस व समाज असतो. अनेक वेळा लक्षात येत नाही कि खर तर अनेक वेळा तो कर्ता करविता असतो.
हा समाज व हे राष्ट्र स्वतः सजीव घटक असते. त्याचा स्वतः चा ध्येयवाद, उर्मी, जीवन उद्दीष्ट, संस्कार, असते. ते इतके तरल असते कि अनेक वेळा याचे विस्मरण होते.
या भूमीचे स्वातंत्र्य, समाजाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? ते स्वातंत्र्य म्हणून काय मागणी करत आहेत? याचा विचार याच समाजाच्या प्रत्येक घटकाने केला का? तो विचार करून स्वातंत्र्य लढ्याचा सारीपाट मांडला गेला का? याचाही विचार आवश्यक होता. यश अपयशाच्या गणितात याला विशेष महत्त्व होते.
या आधारे ही लेखमाला मी चालविली आहे. त्याचे स्पष्टीकरण व अंतिम लेख उद्या.
सुनील देशपांडे.
Article (157/n)
Comments
Post a Comment