सुहंचा सत्कार
सुह मनापासून अभिनंदन. तुमच ध्येयवेडे पण कधी शिकता येईल का?
तुमच्या ध्येयाप्रति निष्ठेला ध्येयनिष्ठा हे घासून गुळगुळीत झालेल नाण वापरता येणार नाही. कारण तुम्ही ध्येयपूर्तीसाठी वेडेपणाचे अनेक उच्चांक केले आहेत.डाॅ हेडगेवार जन्मशताब्दी ला ३६५ व्याख्यान पुर्ततेचा ध्यास मी पाहिला आहे. व या ध्येयवेडे पणात सुध्दा आपण अहंकाराचा वारा शिवू नये म्हणून जी लिनता स्विकारली होती ती तर भल्याभल्यांना सार्वजनिक क्षेत्रात दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आहे. पानच्या पान लिहिता येतील तुमच्या ध्येयवेडेपणावर.
पण तुमचं एकच वाक्य १०० पानांच काम करेल म्हणून तुमच्याच वाक्याने तुमची कौतुकाने स्तुती करतो.
नगरच्या संघ कार्यालयातून बाहेर पडताना समारोपाचे वाक्य असायचे चला सुनीलजी चला भेटू पुढच्या वर्षी सिंधू तिरी. वेडेपणावर हसावे असे वाक्य पण ध्येयधुंद माणसा तुझ्या अपरिमित प्रयत्नांना यश मिळणार. याची देही याची डोळा सिंधूतिरी भेटणार.
तुमच्या भाबड्या आशेला तुमच्या लहान मित्राच्या शुभेच्छा.
सिंधू तिरी भेटू, मग पाणिनीच्या गावाला जाऊ. मग कुणीतरी पाणिनींच्या बद्द्ल काहीतरी बोलेल व तुम्ही लीनपणा घेऊन म्हणाल, खर्रच.
पुन्हा अभिनंदन व न संपणा-या ध्येयवेड्या प्रवासाला शुभेच्छा.
Comments
Post a Comment